वैभववाडी : येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील एनएसएस व एनसीसी विभागातर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून आणि वैभववाडी बाजारपेठेतून मोठया उत्साहात काढण्यात आली.
रॅलीमध्ये आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील NSS विभागाचे स्वयंसेवक आणि NCC कॅडेट्स, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देशभक्तीपर घोषणा देत वैभववाडी शहरातील सर्वं नागरिकांना राष्ट्रीय एकतेचा व अभिमानाचा संदेश देण्यात आला.

‘हर घर तिरंगा’ हे केंद्र सरकारच्या ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत राबविण्यात येणारे अभियान असून, याचा उद्देश प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर राष्ट्रीय ध्वज फडकवून देशभक्तीची भावना दृढ करणे व राष्ट्रीय ध्वजाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे.

या कार्यक्रमावेळी वैभववाडीचे पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी सर्व उपस्थितांना नशामुक्ती अभियानाची शपथ दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त, आरोग्यदायी व जबाबदार जीवन जगण्याचे आवाहन केले. या कार्यकामं साठी प्रभारी प्राचार्य डॉ. एन व्ही गवळी, उपप्राचार्य डॉ. एम आय कुंभार, कार्यालयीन अधीक्षक संजय रावराणे, NCC प्रमुख प्रा.आर. पी.काशेट्टी, NSS कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.विजय पैठणे, प्रा. सत्यजित राजे आणि प्रा. एस. एम. करपे व इतर प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.


