सावंतवाडी : तालुक्यातील नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त पाचवी ते आठवी व नववी ते बारावी या दोन गटांत देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा संपन्न झाली.
नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.भि.राऊळ सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच नववी’ अ’ व नववी’ब’ मधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकांचे अनावरण संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी रमाकांत प्रभूतेंडोलकर व संचालक तुकाराम गुडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. भित्तिपत्रकांसाठी मार्गदर्शन उमेश राऊळ व सी. टी. बंगाळ यांचे लाभले.
येथील डॉ. हेमंतकुमार सावंत यांनी विद्यालयातील पाच गरजू विद्यार्थ्यांसाठी गणवेशसाठी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली. संस्थेचे अध्यक्ष आ.भि. राऊळ सर यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्याना गणवेश वाटप करण्यात आले. तसेच बाल चित्रकला स्पर्धेतील यश प्राप्त विद्यार्थ्यांना रमाकांत प्रभूतेंडोलकर, तुकाराम गुडेकर, प्राचार्या श्रीमती कल्पना बोवलेकर, घनश्याम आळवे, परशुराम नाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
विद्यालयात झालेल्या देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत – पाचवी ते आठवी या लहान गटात प्रथम क्रमांक – ‘सबसे उंची विजय पताका’ (गीत) इयत्ता – सातवी,
द्वितीय क्रमांक – ‘या देशाचा उन्नत’ (गीत) सहावी,
तृतीय क्रमांक – ‘बल सागर भारत होवो!’ (गीत) आठवी ‘अ’
मोठा गट प्रथम क्रमांक – ‘गे माय भू तुझे मी!’ (गीत) दहावी ‘अ’,
द्वितीय क्रमांक – ‘सतरंगी रंगोसा’ (गीत) नववी (ब), तृतीय क्रमांक – ‘पवित्रतेचा पुण्याईचा, आमुचा भारत देश!’ (गीत) अकरावी.
या स्पर्धेचे परीक्षण एम.पी. सारंग यांनी केले. नितीन धामापूरकर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले. तर आभार लवू जाधव यांनी मानले.


