ओटवणे : विलवडे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी माजी उपसभापती कृष्णा उर्फ दादा सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली. विलवडे ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. यावेळी सरपंच प्रकाश दळवी उपसरपंच विनायक दळवी, माजी सरपंच दळवी, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष राजाराम दळवी, निवृत्त सैनिक अरुण दळवी, ग्रामसेवक आरती चव्हाण, भालचंद्र गवस, जयप्रकाश दळवी, शिल्पा धर्णे, परेश धर्णे, आत्माराम दळवी, प्रमोदीनी गवस आदी उपस्थित होते.
कृष्णा सावंत यांनी यापूर्वीही तंटामुक्त समिती अध्यक्ष पदासह गावात अनेक पदे भूषविली. गावाच्या शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रिडा व धार्मिक क्षेत्रात त्यांचे सक्रिय योगदान आहे. या निवडीबद्दल त्यांचे सरपंच प्रकाश दळवी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
विलवडे तंटामुक्ती अध्यक्षपदी कृष्णा सावंत.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


