सावंतवाडी : स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या सहकार्याने आणि भरत कॅरम अकॅडमीच्या वतीने आमदार दिपकभाई केसरकर पुरस्कृत शालेय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण १७३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेचे उद्घाटन सौ. रागिणी सावंत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख बाबु कुडतरकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. माजी शिक्षणमंत्री आमदार दिपक केसरकर यांनी स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले आणि भविष्यात मोठी स्पर्धा आयोजित केल्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण उद्योजक श्री शैलेश पई यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. अनिल तायशेट्ये, पत्रकार श्री अभिमन्यू लोंढे, आर.पी.डी. हायस्कूलच्या शिक्षिका सौ. कुलकर्णी, आणि श्री रामचंद्र सावंत उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी जिल्हा कॅरमचे सचिव श्री योगेश फणसळकर, भारत कॅरम अकॅडमीचे मालक विश्वनाथ उर्फ गोट्या सावंत, अशफाक शेख, अरुण घाडी, सौ. घाडी, अर्पित बांदेकर, रामा गावडे, ताजबूल मकानदार, रुद्र चव्हाण, देवांग मल्हार, स्वप्नील लाखे आणि कुणाल खोरागडे यांनी परिश्रम घेतले.
स्पर्धेतील विजेते:१२ वर्षांखालील मुली:
प्रथम: आरोही सावंत (आर.पी.डी. हायस्कूल)
द्वितीय: योगिता राऊळ (आर.पी.डी. हायस्कूल)
तृतीय: जीविका बांदेकर (शाळा क्रमांक ४)
१२ वर्षांखालील मुले:
प्रथम: भरत सावंत (कळसुलकर हायस्कूल)
द्वितीय: आर्यन दळवी (तळवडा)
तृतीय: यश चव्हाण (बीकेसी)
१४ वर्षांखालील मुले:
प्रथम: गंधार नार्वेकर (मळगाव शाळा)
द्वितीय: पियुष डवाळे (आर.पी.डी. हायस्कूल)
तृतीय: पियुष परब (तळवडे)
१७ वर्षांखालील मुली:
प्रथम: आस्था लोंढे (मिलाग्रिस हायस्कूल)
द्वितीय: वैष्णवी गवस (मदर क्वीन्स)
तृतीय: अक्षरा लाखे (व.स. खांडेकर हायस्कूल)
१७ वर्षांखालील मुले:
प्रथम: बेनीट डीसा (मदर क्वीन्स)
द्वितीय: इब्राहिम शहा (सेंट्रल हायस्कूल)
तृतीय: रुद्र चव्हाण (कळसुलकर हायस्कूल)
यांनी क्रमांक पटकाविले. भरत कॅरम अॅकडमी चे मालक विश्वनाथ उर्फ गोट्या सावंत दरवर्षी स्वातंत्र्य दिनी मुलांना प्रोत्साहन देणारी स्पर्धा भरवून प्रोत्साहन देत असल्याने आमदार दीपक केसरकर, शैलेश पई, डॉ तायशेटे व मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.
भरत कॅरम अॅकडमी च्या कॅरम स्पर्धेत आमदार दीपक केसरकर यांचे स्वागत करताना अरूण घाडी, शेजारी गोट्या सावंत, योगेश फणसळकर, अश्फाक शेख, अर्पित बांदेकर,सौ . घाडी व मान्यवर


