ओरोस : येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे स्केटिंग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी दर्शवली. यामध्ये प्रशालेच्या स्केटर संघातील इयत्ता ३ री मधील ‘ कु. क्रिशा साळवी ‘ हिने ११ वर्षाखालील मुलींच्या स्केटिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. तर इयत्ता ५ वी मधील ‘ कु. किमया पोटे ‘ हिने चौदा वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच, १४ वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत इयत्ता ६ वी मधील ‘ कु. रेहान सारंग ‘ याने प्रथम क्रमांक व इयत्ता ७ वी मधील ‘ कु. वैष्णव सावंत ‘ याने तृतीय क्रमांक पटकावला. प्रशालेतील या स्केटिंग संघाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना प्रभावी यश प्राप्त झाले. त्यांनी आपल्या कठोर परिश्रम आणि उत्कृष्ट त्याची वचनबद्धता या खेळाद्वारे दर्शवली. वरील विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक समद शेख व हमीद शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस प्रोत्साहन दिले.
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांची स्केटिंग स्पर्धेत दमदार कामगिरी!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


