सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य तर्फे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन आंबोली येथे करण्यात आले होते.या स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
14 वर्षाखालील वयोगटांमध्ये कु.निहारिका अमित मेस्त्री हिने,42 ते 48 किलो वजनी गटामध्ये प्रथम स्थान पटकावले. कु. साची शिवनाथ टोपले हिने 46 ते 50 वजनी वयोगटात पहिले स्थान प्राप्त केले. तर कु. सिद्धी उदय गावकर हिने 50 किलो पेक्षा अधिक वजनी गटामध्ये दुसरे स्थान मिळविले.
कु. सुलोचना राहुलप्रसाद राजपूत हिने 42 ते 46 किलो वजनी गटामध्ये द्वितीय स्थान ,कु. हर्षिता सचिन पाटकर हिने 30 किलो खालील वजनी गटामध्ये तृतीय स्थान प्राप्त केले. कुमारी वैभवी दीपक लोके हिने 50 किलो पेक्षा जास्त वजनी गटामध्ये तृतीय स्थान प्राप्त केले आहे.
17 वर्षाखालील वयोगटांमध्ये कु. लिशा व्यंकटेश नायर हिने 40 किलो पेक्षा कमी वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक, कु.आदिती अनिल नाटलेकर हिने 64 किलो पेक्षा कमी वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक तर कु. धैर्या विजय गावकर हिने 48 ते 52 किलो वजनी गटांमध्ये द्वितीय क्रमांक आणि कु.पूर्वा आदिनाथ गवस हिने 60 ते 64 किलो वजनी गटामध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे.
सदर विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री हितेश मालणकर व श्रीम. शेरॉन अल्फांसो यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय फादर रिचर्ड सालदान्हा, पर्यवेक्षिका श्रीम. संध्या मुणगेकर यांनी विशेष अभिनंदन केले आहे.


