Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

विद्यार्थ्यांनी भविष्यात अधिकारी व्हावे : माजी मंत्री आ. दीपक केसरकर. ; सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न!

संजय पिळणकर.

– माजी शालेयमंत्री दीपक केसरकर यांची विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप.
सावंतवाडी : तालुका भंडारी मंडळ, सावंतवाडी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन रविवार दि १० ऑगस्ट २०२५ रोजी भंडारी भवन,सावंतवाडी येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन मंडळाचे अध्यक्ष दत्तप्रसाद अरविंदेकर,भंडारी पतपेढीचे चेअरमन गुरूदास पेडणेकर,महिला अध्यक्षा सौ.शीतल नाईक, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे सावंतवाडी तालुका सल्लागार सुधीर पराडकर,सचिव दिलीप पेडणेकर, उपाध्यक्ष देविदास आडारकर,हनुमंत पेडणेकर,सामाजिक कार्यकर्त्या सौ.श्रेया सुधीर आडिवरेकर,राजेंद्र बिर्जे,नंदकिशोर कोंडये,शंकर साळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलननाने करण्यात आले.
यावेळी सावंतवाडी तालुक्यातील भंडारी समाजाच्या इयत्ता दहावी, बारावी,पदवीका,पदवी,
पदव्यूत्तर,इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख बक्षिसे,प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
तसेच यावर्षी तालुक्यातील गरजू व होतकरू अशा ६ विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने व दाते सुधीर पराडकर (कै.ऍड.श्रीधर सावळाराम पराडकर यांच्या स्मरणार्थ) व चंद्रकांत वाडकर यांच्या सहकार्याने दत्तक घेऊन यावेळी रोख स्वरूपात आर्थिक मदत दिली गेली.
तसेच यावर्षीपासून भंडारी मंडळाच्या वतीने व दाते संजय पिळणकर (कै.सखाराम भगवान पिळणकर यांच्या स्मरणार्थ) व श्रीम.रंजना मनोहर राऊळ (कै.मनोहर सगूण राऊूळ यांच्या स्मरणार्थ) ‘भंडारी समाजरत्न’ पुरस्कार दिले गेले.त्यात एम फार्मा पदवीमध्ये सुवर्णपदक विजेती कु.नेहा तुळशीदास मयेकर,शैक्षणिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल प्राथमिक शिक्षक रामा वासुदेव पोळजी,माध्यमिक कला शिक्षक व कलारत्न पुरस्काराने सन्मानित केदार सखाराम टेमकर,महाराष्ट्र शासनाचा २०११-१२ चा जिल्हा क्रीडा प्रशिक्षक पुरस्कार प्राप्त कांचन वसंत उपरकर यांना ‘भंडारी समाजरत्न’ पुरस्काराने माजी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पिळणकर,संतोष वैज,प्रतिभा कांबळी,प्रास्ताविक व अहवाल वाचन नामदेव साटेलकर,तर आभार बाळा आकेरकर यांनी मानले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles