Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

‘घे भरारी’ फाऊंडेशनच्या चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद! ; स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजन.

सावंतवाडी : नुकतेच शाळा नंबर -4 , सावंतवाडी या प्राथमिक शाळेमध्ये घे भरारी फाउंडेशन च्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले..या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच 15 ऑगस्ट 2025 रोजी सावंतवाडी प्राथमिक शाळा नंबर चार या ठिकाणी संपन्न झाला..इयत्तावार प्रत्येक गटातील यशस्वी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पारितोषिके देऊन घे भरारी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि सदस्यांच्या वतीने गौरविण्यात आले आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले . यावेळी विद्यार्थी , पालक , शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्कृष्ट चित्रकला स्पर्धेच्या आयोजनाबद्दल सर्वच स्तरातून घे भरारी फाउंडेशन सावंतवाडी यांचे पालक वर्गाकडून आणि शिक्षक वर्गाकडून भरभरून कौतुक करण्यात आले. घे भरारी फाउंडेशन सावंतवाडी यांच्यावतीने वर्षभरात अनेक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक , समाज उपयोगी उत्कृष्ट आणि उत्तमोत्तम कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले जातात.. सावंतवाडीतील महिलांनी एकत्र येऊन समाज सुसंस्कृत बनवण्यासाठी आणि सुदृढ बनण्यासाठी जे शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य केलेले आहे आणि करत आहेत ते खरोखरच कौतुकास्पद आहे असे मत फाउंडेशनच्या कार्याध्यक्षा मेघना राऊळ यांनी व्यक्त केले . उत्कृष्ट चित्रकला काढल्याबद्दल फाउंडेशनच्या संस्थापिका मोहिनी मडगावकर यांनी मुलांचे भरभरून कौतुक केले तसेच सावंतवाडी च्या चार नंबर शाळेमध्ये स्वतः प्राथमिक शिक्षण घेतलेल्या रेखा कुमटेकर यांनी शाळेच्या यशाबद्दल शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मनापासून अभिनंदन केले . या स्पर्धेमध्ये यशस्वी स्पर्धकांची नावे खालीलप्रमाणे

*पहिला गट…इयत्ता पहिली आणि दुसरी*
प्रथम क्रमांक ..अवनी नितीन घाटे
द्वितीय क्रमांक ..निधी महेश घाडी
तृतीय क्रमांक.,गिरिजा परशुराम तुबंगी
उत्तेजनार्थ ..अन्वी प्रभाकर वडार आणि अंकुश संजय गाड

*दुसरा गट….इयत्ता तिसरी आणि चौथी*
प्रथम क्रमांक ..प्रिया प्रकाश मेस्त्री
द्वितीय क्रमांक…रितेश रवींद्र परब
तृतीय क्रमांक..रागिनी दयानंद पवार
उत्तेजनार्थ ..स्वानंदी बाबासाहेब पाटील आणि आदित्य पियुष येजरे

*तिसरा गट …इयत्ता पाचवी आणि सहावी*
प्रथम क्रमांक..आयुष नरेंद्र नाईक
द्वितीय क्रमांक..रुही सुरेंद्र जामदार
तृतीय क्रमांक ..उर्वी अमितकुमार टक्केकर उत्तेजनार्थ ..हार्दिक अनुजा वरक आणि हर्षवर्धन गजानन भोसले

स्पर्धेचे परीक्षण सरिता फडणीस आणि अरुणा नाईक यांनी उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल त्यांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले. घे भरारी च्या अध्यक्षा रेखा कुमटेकर यांनी यावेळी शाळेला शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यावेळी घे भरारी फाउंडेशनच्या वतीने संस्थापिका मोहिनी मडगावकर , अध्यक्षा रेखा कुमटेकर , कार्याध्यक्षा मेघना राऊळ, गीता सावंत , शारदा गुरव , ज्योती दुधवडकर, मेघना साळगावकर , शरदिनी बागवे, प्रतीक्षा गावकर, सीमा रेडीज, मेघा भोगटे , वंदना मडगावकर , शिल्पा जाधव इत्यादी उपस्थित होत्या. .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघना प्रकाश राऊळ यांनी केले आणि शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका धारगळकर मॅडम यांनी हे भरारी फाउंडेशन- सावंतवाडी यांचे उत्कृष्ट उपक्रमाबद्दल आणि उत्कृष्ट कार्याबद्दल आभार व्यक्त केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles