सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीमध्ये आयोजित तीन दिवसीय भव्य ‘नाट्यमहोत्सवा’चा शुभारंभ माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. शुभारंभाला ‘भगदत्त वध’ हे नाटक सादर करण्यात आले. याला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
![]()
येथील गोविंद चित्रमंदिरात या नाट्यमहोत्सवास प्रारंभ झाला. माजी उपनगराध्यक्ष श्री. पोकळे यांच्या उपस्थितीत या उत्सवास प्रारंभ झाला. यावेळी नारदाची भुमिका साकारणारे ज्येष्ठ दशावतार कलावंत विठ्ठल गांवकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हा प्रमुख विनायक दळवी, महिला शहरप्रमुख भारती मोरे, झेवियर फर्नांडिस, वासुदेव होडावडेकर, सुहास कोळसुलकर, परिक्षीत मांजरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे म्हणाले, संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त तिन दिवसीय नाट्यमहोत्सव होत आहे. त्यांच्या रूपानं एक तडफदार नेतृत्व पक्षाला लाभलं आहे. दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची घौडदौड मतदारसंघात सुरू आहे. दशावतार कलेमुळे जिल्ह्याची ओळख सातासमुद्रापार गेली आहे. आम. केसरकर यांच्या माध्यमातून १५ दशावतार कंपन्यांना वाहन उपलब्ध करून दिली आहेत. श्री. परब यांच्या माध्यमातून देखील या कलेला प्रोत्साहन मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी म्हणाले, मतदारसंघात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं जिल्ह्यात आहेत. तालुकाप्रमुख बबन राणे म्हणाले, संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम शिवसेना राबवित आहेत. गोरगरीबांसाठी धावून जाणारे हे नेतृत्व आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो. आमदार दीपक केसरकर यांना वारसा संजू परब निश्चित जोपासतील. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांत त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला मोठं यश मिळेल असा विश्वास वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी व्यक्त केला. तसेच भारती मोरे, विनायक दळवी आदींनी मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई यांनी केले. यावेळी माजी नगरसेविका दिपाली सावंत, आबा केसरकर, सुजित कोरगावकर, अर्चित पोकळे, निखिल सावंत, पुजा सोन्सुरकर आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, १८ ऑगस्ट रोजी ‘राजा सोमदत्त अर्थात सदोबा पाटील’ तर, महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध ऐतिहासिक नाटक ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



