- प्रा. रूपेश पाटील.
‘रोखठोक, बिनधास्त, बेधडक अन् दिलखुलास’ या शब्दांच दुसरं नाव म्हणजे सच्चिदानंद उर्फ संजू परब. तरूण, तडफदार, लोकांच्या प्रश्नांची जाण आणि तळमळ असलेला हा झुंजार नेता. संजू परब नावाच्या या झंझावाताने अल्पावधीतच राजकारणात आपल वेगळ स्थान निर्माण केल आहे. शाखाप्रमुख, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष, कॉंग्रेस, स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष, जिल्हा चिटणीस ते नगराध्यक्ष आणि आता शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचा रोखठोक, फायरब्रॅण्ड अंदाज ही त्यांची खासियत आहे. त्यांच्यावर सोपवलेली प्रत्येक जबाबदारी तेवढ्याच ताकदिने त्यांनी यशस्वीपणे निभावली. सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांना समाजकार्याचा पिंड स्वस्थ बसू देत नव्हता. जिथे अन्याय दिसेल तिथे संजू परब उभे राहत होते. अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिल्याशिवाय ते स्वस्थ बसलेच नाही. या कारणामुळेच संजू परब हे नाव सावंतवाडीत प्रत्येक घराघरात पोहचलंय.

मडूरासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या संजू परब यांचे शालेय शिक्षण व पदवी शिक्षण सावंतवाडीतच झाले. कॉलेजजीवनातच त्यांच्या नेतृत्वगुणाची चमक दिसून आली. 1999 मध्ये ते शिवसेना शाखा प्रमुख म्हणून कार्यरत होते. केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी काँग्रेसचा ‘हात’ पकडला. २००८ मध्ये त्यांच्यावर राष्ट्रीय युवक कॉंग्रेस तालुका उपाध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली. २००९ मध्ये युवक कॉंग्रेसचे ते तालुकाध्यक्ष झाले. यावेळी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांना विजयी करून खासदार म्हणून दिल्लीला पाठवण्यात संजू परब यांनी मोठा वाटा उचलला. याचवेळी निलेश राणे यांच्या हृदयात त्यांनी स्थान निर्माण केल. निलेश राणेंचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख आहे. २०१० ते २०१३ मध्ये ते युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनंतर जिल्हा सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती झाली. तर २०१४ मध्ये सावंतवाडीच्या तालुकाध्यक्षपदी ते विराजमान झाले. यावेळी विरोधकांना अंगावर घेत तालुका पिंजून काढला. गावोगावी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना एकत्र करण्यास सुरुवात केली. जनतेसाठी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केली. प्रसंगी अंगावर केसेस घेतल्या.

तत्कालीन परिस्थितीत सावंतवाडी शहरात आमदार दीपक केसरकर यांच वर्चस्व असताना सावंतवाडी नगरपरिषदच्या निवडणुकीत १७-० अस चित्र होत. अशावेळी संजू परब यांनी सर्वाधिक ८ नगरसेवक निवडून आणले. तात्कालिन पालकमंत्री दीपक केसरकर यांना त्यांच्या होमपिचवर दिलेला हा पहिला धक्का ठरला. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका याची पुनरावृत्ती झाली. जिल्हा परिषदेच्या ९ पैकी ५ तर पंचायत समितीच्या १८ पैकी ११ जागा काँग्रेसच्या निवडून आल्या. यात संजू परब यांचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ८० टक्के ग्रामपंचायती निवडून आणल्या. राणे कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर ‘स्वाभिमान’मध्ये राणे कुटुंबाची साथ दिली. यातच संजू परब यांच्या वाढदिवसाला तात्कालिन पालकमंत्री दीपक केसरकर हे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांना घेऊन हजर राहिले. यानंतर सिंधुदुर्गातील राजकारणात एकच खळबळ उडाली होती. मात्र, कोणत्याही आमिषांना बळी न पडता ते एकनिष्ठ राहिले.
२०१९ मध्ये राणे भाजपवासी झाले. राणेंच्या भाजप प्रवेशानंतर तालुका भाजपमय करण्याचा निर्धार त्यांनी केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षानं दिलेली जबाबदारी पार पाडली. त्यानंतर बांदा ग्रामपंचायत सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत अक्रम खान यांना निवडून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. यातचं सावंतवाडी नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक लागली. माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणेंच्या पाठिंब्यानं लढवय्या संजू परब यांनी ही लढाई लढली. नुसती लढलीच नाही तर विरोधकांना धूळ चारत गड सर केला. संजूच ‘किंग’ आहे हे दाखवून दिलं.

इतिहासात पहिल्यांदाच सावंतवाडीच्या पालिकेवर भाजपचा झेंडा फडकला. तब्बल 25 वर्षांनंतर 29 डिसेंबर 2019 रोजी सावंतवाडीच्या प्रथम नागरीक पदाची जबाबदारी संजू जगन्नाथ परब यांच्याकडे नागरिकांनी दिली. 1 जानेवारी 2020 ला नगराध्यक्ष पदाचा पदभार त्यांनी स्वीकारला. त्यांच्याकडे फक्त 720 दिवसांचा कालावधी होता. त्यात दिड वर्ष कोरोनासारख मोठ संकट जगावर आल. अशावेळी देखील विकासाचा झंझावत त्यांनी थांबू दिला नाही. शहराचा विकास हेच उद्दिष्ट समोर ठेवत त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली. प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नसताना देखील त्यांनी प्रशासन नुसत चालवलं नाही तर पळवल. एक यशस्वी उद्योजक, समाजसेवक असणाऱ्या संजू परब यांनी नगराध्यक्ष म्हणून दिलेल्या वचनाची पूर्ती केली.त्यांनी घेतलेले धडाकेबाज निर्णय, कोरोनाकाळात जीवाची पर्वा न करता एखाद्या योध्यासारखे मैदानात उतरलेले संजू परब कायमच सावंतवाडीकरांच्या आठवणीत राहतील. एवढच नव्हे तर प्रत्येक विभागाचा बारकाईने आढावा, अधिकारी कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची कडक सूचना आणि आपल्या तक्रारींसाठी नागरिकांना मोकळी केलेली पालिकेतली सर्व दालनं यावरूनच त्यांच्या प्रचंड ताकतीचा सर्वांना प्रत्यय आला होता. प्रशासन पळवल तर पळत, मात्र त्यासाठी इच्छा शक्ती असावी लागते हे त्यांनी दाखवून दिल. विशेष करून विकासकामांना त्यांनी प्राधान्य दिल. आतापर्यत तब्बल 51 विकासकाम पूर्णत्वास आली असून ६६ काम प्रत्यक्षात सुरु आहेत. यासाठी तब्बल ५ कोटी ९६ लाख २८ हजार ९१५ रुपये एवढा भरघोस निधी खर्च करण्यात आला. त्यांच्या काळात माझी वसुंधरा अभियानामध्ये सावंतवाडी नगरपरिषद जिल्ह्यात प्रथम तर महाराष्ट्र राज्यात १७ वा क्रमांक प्राप्त झाला. कोरोना महामारीत त्यांनी उल्लेखनीय काम केल. स्वत: कोरोनाबाधित झाल्यानंतर देखील ते थांबले नाही, तर आणखीन जोमान कामाला लागले. शहरासह तालुक्यातील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन स्वखर्चाने १७० ‘कोरू बेड’ खरेदी केले. स्वखर्चातून पुढाकार घेणारे ते पहिलेचं नगराध्यक्ष ठरले. शहरात काम करत असताना गावातून शहरात आलेल्या संजू परब यांनी गावाशी असलेली नाळ कायम ठेवली. गावदौरा करत त्यांनी गावातील लोकांच्याही समस्या जाणून घेतल्या. सर्वसामान्य कार्यकर्त्याना जपणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. कितीही विरोध झाला तरी बेहत्तर, जे योग्य आहे, ते मी करणारच या भूमिकेवर ते ठाम असतात. रोखठोक , बेधडक अंदाजामुळेचं!
संजू परब यांची शिवसेना जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाली. या पदाला न्याय देत त्यांनी विरोधकांना अक्षरशः अंगावर घेतले. आपला रोखठोक फायरब्रॅण्ड अंदाज त्यांनी दाखवून देत विरोधकांना घाम फोडला. आतापर्यंतच्या या प्रवासात त्यांच्या कुटुंबीयांची समर्थ साथ लाभली. आई-वडिलांचे संस्कार अन समाजासाठी त्यांनी केलेलं काम संजू परब पुढे घेऊन जात आहेत. वडिलांनंतर सावंतवाडी दोडामार्ग मराठा समाज उत्कर्ष मंडळाचे अध्यक्षपद ते समर्थपणे संभाळत आहेत. आगामी नगरपरीषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची एकहाती सत्ता बसविण्यासोबत सेनेचा नगराध्यक्ष पुन्हा एकदा न.प.वर जिंकून आणायचा आहे. त्यांच्या कामाचा धडाका, विकासात्मक दृष्टी, निर्णयक्षमता आणि राजकीय मुद्स्द्दीपणा यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातय. आमदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची त्यांची देखील इच्छा असून आपल्या लाडक्या संजूला आमदार म्हणून पाहण्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांच स्वप्न आहे. अशा ह्या रोखठोक, धडाकेबाज, दिलदार नेत्यास वाढदिवसाच्या आमच्या टीम सत्यार्थडून मनस्वी लक्ष लक्ष शुभेच्छा…!
राजकीय प्रवास –
▪️१९९९ शिवसेना शाखा प्रमुख
▪️२००८ राष्ट्रीय युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष
▪️२००९ राष्ट्रीय युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष
▪️२०१० ते २०१३: राष्ट्रीय युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष
▪️२०१४ राष्ट्रीय कॉग्रेस जिल्हा सरचिटणीस, तालुका अध्यक्ष
▪️२९ डिसेंबर २०१९ सावंतवाडी नगराध्यक्ष म्हणून विजयी
▪️३० डिसेंबर २०१९ नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला
▪️२०१९ भाजप जिल्हा प्रवक्तेपदी नियुक्ती
▪️२०२५ शिवसेना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
सावंतवाडीच्या विकासासाठी नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्याकडे फक्त ७२० दिवस होते. यातच कोरोनामुळे विकासकामांना राज्यातून येणाऱ्या निधीला ब्रेक लागला होता. मात्र, जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी संजू परब यांनी अथक मेहनत घेतली. त्यांच्या कारकिर्दीत तब्बल ५१ विकासकामे पूर्णत्वास आली असून, ६६ कामे प्रत्यक्षात सुरू आहेत. यासाठी तब्बल १३ कोटी २१ लाख ३९ हजार ५४७ रुपये एवढा भरघोस निधी खर्च करण्यात आला आहे.
▪️काझी शहाबुद्दीन हॉलचे नूतनीकरण
▪️घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प
▪️मंडईने घेतला मुक्त श्वास
▪️जलतरण तलावाचे लोकार्पण
▪️छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच भुमिपूजन
▪️क्रीडाक्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी
▪️I LOVE सावंतवाडी सेल्फी पॉईंट
▪️बॅ.नाथ पै सभागृह कामाचे नूतनीकरण
▪️कॉनव्हेक्स मिरर, बांबू लागवड आदी काम
▪️कोरोना महामारीत स्वखर्चाने पुढाकार
▪️नगरपालिकेच क्वारंटाइन हेल्प सेंटर सुरू
▪️भोसले शिवउद्यान कुंपण भिंतीचे बांधकाम
▪️रोजगार निर्मितीसाठी पुढाकार
▪️एमटीडीसीमधील कोट्यवधींचा घोटाळा बाहेर
▪️माझी वसुंधरा अभियान
▪️नळपाणी योजनेस मंजुरी
▪️माजी सैनिकांसाठी हक्काची जागा.
”झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळही पाहत रहावा,
कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून, यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिकाधिक विस्तारीत होत जावो,
तुमच्या समृध्दीच्या सागराला किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढील आयुष्य सुख, समृद्धी, निरामय आणि ऐश्वर्य संपन्न होवो, हीच सदिच्छा..!
वाढदिवसाच्या हृदयपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
स्नेह तर कायमचं, वृद्धीची अभिलाषा..!
🎂आपलाच स्नेही🎂
✍️..रुपेश पाटील..✍️ आणि सत्यार्थ न्यूज परिवार..
सावंतवाडी..!
🎂🎂🎂🎂🎂


