मुंबई : कोकण सुपुत्र विशाल परब असंख्य कार्यकर्त्यांसह आज मुंबईत दाखल झाले आहेत. परब यांचे निलंबन मागे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची ताकद दाखवण्यात आली आहे.
थोड्याच वेळात भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अधिकृत घोषणा होणार असून, परब यांचे निलंबन मागे घेतले जाणार आहे.
कोकणातील हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाल्याने भाजप भवन परिसरात उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला आहे.
या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, पुढील राजकीय घडामोडींना अधिक वेग येणार असल्याचे बोलले जात आहे.


