मुंबई : मी भारतीय जनता पार्टीचा एक छोटासा प्रामाणिक कार्यकर्ता असून भारतीय जनता पार्टी तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आजपर्यंत काम केलेले आहे आणि तेच काम पुढे सुद्धा करणार आहे. भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा पक्ष असून पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी महनेत घेणार असल्याचे प्रतिपादन युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत तसेच हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने युवा नेते विशाल परब यांचे भाजप पक्षाद्वारा केलेले निलंबन मागे घेतले असून त्यांना आता पक्षाचे काम करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
दरम्यान विशाल परब यांचे निलंबन मागे घेण्यासोबत अमित परब, केतन आजगांवकर, रंगनाथ गवस, नितीन राऊळ, बाळा उर्फ नारायण जाधव, स्वप्नील राऊळ, विजय रेडकर यांचे देखील निलंबन मागे घेण्यात आले व त्यांचे भारतीय जनता पार्टी मध्ये स्वागत करण्यात आले.


