कणकवली : येथील कणकवली महाविद्यालयातील
सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक सुरेश बळवंत पाटील यांना मुंबई विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी. ही पदवी प्रदान केली. प्रा. सुरेश पाटील यांनी ऑप्टिमायझेशन ऑफ प्रोडक्शन अँड कॅरेक्टरायझेशन ऑफ किराटीनेज एंजाइम प्रोड्युस्ड बाय बॅकटेरियम आयसोलेटेड फ्रॉम पोल्ट्री वेस्ट. या महत्वपूर्ण विषयावरील अभ्यासपूर्ण शोधप्रबंध मुंबई विद्यापीठास सादर केला होता.
मुंबई विद्यापीठाने हा प्रबंध स्वीकारून मुलाखतीनंतर प्रा. सुरेश पाटील यांना विद्यावाचस्पती ही सर्वोच्च पदवी प्रदान केली. सदर संशोधनामध्ये प्रा. सुरेश पाटील यांनी नाविन्यपूर्ण संशोधन केले आहे.
त्यांनी संशोधना मधून शोधलेला जिवाणू व त्याची उत्प्रेरके हे कृषी क्षेत्रात खत निर्मितीसाठी आणि औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण विरहित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वापरात येऊ शकतात. या मौलिक संशोधनासाठी प्रा. सुरेश पाटील यांना मुंबई येथील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. के. अरुणा समुद्रविजय यांचे मार्गदर्शन मिळाले.
प्रा. सुरेश पाटील हे कणकवली महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असून राष्ट्रीय सेवा योजना, नोकर भरती कक्ष या विविध विभागाच्या माध्यमातून महाविद्यालय, विद्यार्थी व समाजसेवा या उपक्रमासाठी ते क्रियाशील असतात. सामान्य शेतकरी कुटुंबातून अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने सूक्ष्मजीवशास्त्रासारख्या विषयात पीएच.डी. पदवी मिळाल्याबद्दल प्रा.सुरेश पाटील यांचा कणकवली महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.
प्रा. सुरेश पाटील यांनी उत्कृष्ट संशोधन करून महाविद्यालयाच्या लौकिकात भर घातल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय तवटे, चेअरमन प्रा. डॉ.राजश्री साळुंखे, सचिव श्री. विजयकुमार वळंजू, सर्व विश्वस्त व सदस्य, आणि प्र.प्राचार्य युवराज महालिंगे यांनी अभिनंदन केले आहे.
कणकवली महाविद्यालयातील प्रा. सुरेश पाटील यांना ‘सूक्ष्म जीवशास्त्र’ विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


