- सावंतवाडी येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याबाबत व रिक्त पदे भरण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा.
सिंदूदुर्ग : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांबाबत मनसे तर्फे व कारिवडे ग्रामस्थांच्या वतीने दिनांक १५ ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात या बाबत बैठक घेण्यात आली . मनसे जिल्हाध्यक्ष ॲड.अनिल केसरकर व कारीवडे सरपंच माळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला सोबत यावेळी चर्चा करण्यातआली .सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांबाबत तसेच डॉक्टरांची रिक्त असलेली पदे , अपुऱ्या अत्याधुनिक रुग्णवाहिका व अन्य समस्यांबाबत विस्तृत चर्चा यावेळी करण्यात आली व आपण या प्रश्नी स्वतः लक्ष घालत असून या सर्व प्रश्नांवर शासन स्तरावर आपण पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासक या वेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहे.मनसेतर्फे देण्यात आलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर हि बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश खेबूडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे, डॉ. वजराटकर, डॉ.चौगुले,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत , मनसे सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत, व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.


