Tuesday, September 16, 2025

Buy now

spot_img

गुरुजींचा अश्लील कारनामा! ; विद्यार्थीनींकडूनकेलेली ‘ही’ मागणी ऐकून डोकचं फिरेल!

रांची : गुरु – शिष्याचा संबंध हा जगातील सर्वात पवित्र नात्यांपैकी एक मानला जातो. शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत, तर त्यांच्या जीवनाचे मार्गदर्शकही असतात. ते त्यांना घडवतात. मात्र, झारखंडची राजधानी रांची येथे एका शिक्षकाने आपल्या कृत्यांमुळे या पवित्र नात्याला कलंकित केले आहे. यामुळे लाखो पालकांच्या मनात आपल्या मुलींच्या सुरक्षेबाबत भीती निर्माण झाली आहे.

रांचीच्या रातू रोडवरील श्रद्धानंद सेवाश्रम मध्य विद्यालयात अशीच एक धक्कादायक घटना घडली. या शिक्षकावर आरोप आहे की, त्याने शाळेत शिकणाऱ्या सुमारे एक डझनहून अधिक विद्यार्थिनींसोबत अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्याने व्हॉट्सअॅप चॅटदरम्यान त्यांच्या अंडरवेअरचा रंग विचारला, शारीरिक संबंधांसाठी प्रोत्साहित केले आणि व्हिडीओ कॉलद्वारेही संपर्क साधला.

 

शिक्षकाने अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या –

रांचीचे उपायुक्त मंजूनाथ भजंत्री यांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ याची गंभीर दखल घेतली. त्यांनी रांची जिल्ह्याच्या डीईओ आणि डीएसओ यांना तपासाचे निर्देश दिले. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी एक तपास समिती स्थापन केली आणि शाळेत जाऊन या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. या प्रकरणाची तक्रार एका गुमनाम पत्राद्वारे शिक्षण सचिव, रांची यांच्या नावे करण्यात आली होती. पत्रात नमूद करण्यात आले आहे की, रातू रोडवरील श्रद्धानंद सेवाश्रम मध्य विद्यालयातील शिक्षक अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करत आहे. व्हॉट्सअॅपवर अश्लील चॅटिंग, शारीरिक संबंधांसाठी दबाव आणि नग्न अवस्थेत व्हिडीओ कॉलवर बोलण्यासाठी दबाव टाकला जात आहे. तसेच, अल्पवयीन मुलींना हॉटेलमध्ये नेण्याचाही प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.

आरोपी शिक्षक फरार –

या प्रकरणाची माहिती मिळताच आरोपी शिक्षक शाळेतून गायब झाला आहे. शाळेचे मुख्यध्यापक अनुज कुमार सिंह यांनी सांगितले की, त्यांच्याकडे कोणत्याही विद्यार्थिनी किंवा त्यांच्या पालकांकडून अशी कोणतीही तक्रार आलेली नाही. मात्र, एक गुमनाम पत्र प्राप्त मिळाले आहे, ज्यावरून उपायुक्तांनी तपास समिती स्थापन केली आहे. तपासात जे काही आढळेल, त्यानुसार कारवाई केली जाईल. त्यांनी हेही नमूद केले की, सध्या शिक्षक अनुपस्थित आहे आणि त्याचा फोनही लागत नाही.

24 तासांत तपास अहवाल सादर करण्याचे आदेश –

रांचीचे उपायुक्त मंजूनाथ भजंत्री यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत डीईओ आणि डीएसई यांना तपासाचे निर्देश दिले आहेत. एक तपास समिती गठित करण्यात आली असून, ती 24 तासांत तपास पूर्ण करून अहवाल सादर करेल. जर तपासात शिक्षक दोषी आढळला, तर त्याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यासह विविध कलमांनुसार कारवाई केली जाईल.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles