सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायतचे प्रभारी ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानदेव सिताराम चव्हाण (मूळ सजा ग्रामपंचायत इन्सुली, तालुका सावंतवाडी) यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेताना पकडल्याचे वृत्त स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. ज्ञानदेव चव्हाण हे जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे कर्मचारी असल्याने त्यांना २३ ऑगस्ट २०२५ रोजीच्या आदेश क्रमांक १४४७ अन्वये जिल्हा परिषद सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


