सावंतवाडी : श्री देवी पावणाई दुग्ध उत्पादक सहकारी संस्था माडखोलची सर्व साधारण सभा संस्थेच्या नूतन इमारतीत आज सोमवार दिनाक २५ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आली. यावेळी संस्थेचे चेअरमन ॲड. सुरेश आडेलकर, व्हाईस चेअरमन संदीप येडेगे, संचालक पांडुरंग राऊळ, गजानन धुरी, रामचंद्र सावंत, अशोक सावंत, प्रकाश राऊळ, आत्माराम लाटये, रुक्मिणी सावंत, आत्माराम साईल आदि हजर होते.
यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ॲड. सुरेश आडेलकर यांनी संस्थेच्या उत्तरोत्तर होणाऱ्या प्रगतीचा आढावा सांगितला. तसेच संस्थेच्या प्रामाणिक आणि मेहनती शेतकऱ्यांच्यामुळेच ही प्रगती होत असल्याने समाधान व्यक्त केले. दिवसाकाठी ५ लिटर दुधापासून ५०० लीटरचे उद्दीष्ट गाठतांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागले. गोकुळ आणि शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविणे, पशुखाद्य डेअरीमधे उपलब्ध करून देणे, दर १० दिवसांनी शेतकऱ्याचा खात्यावर पगार जमा करणे. दर १० दिवसाचे कॉम्प्युटर्सचे बिल देणे, सदरचे बिल सिंधुदुर्ग बँकांमध्ये सर्व शेतकऱ्याची खाती उघडून अकाऊंटवर पेमेंट जमा करून कॅशलेस पद्धत राबविल्यामुळे दूध डेअरी आणि शेतकरी यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे, असे मत चेअरमन यांनी व्यक्त केले.

यावेळी मार्गदर्शन करताना घाट माथ्यावर दुग्ध व्यवसायला आधुनिकतेची जोड दिल्यामुळे तेथील दुग्ध व्यवसाय प्रभावी पण वाढला आहे. मात्र आपण फक्त पारंपरिक रूढीवर अवलंबून राहिल्यामुळे दुग्ध व्यवसाय वाढीस अडचणी निर्मांत होत आहेत. दुग्ध व्यवसाययाला चालना देणयासाठी लवकरच गोकुळ दुग्ध संघाचे मार्गदर्शन शिबीर लावण्याचे या सभेत ठरविण्यात आले.
या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना दुग्ध उत्पादक शेतकरी नामदेव गवळी याने ह्या दुध डेअरीने पूर्ण पारदर्शी व्यवहार ठेवल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात कुठलीही शंका राहत नाही. तसेच खात्यावर दर १० दिवसांनी थेट पेमेंट खात्यावर जमा होत असल्याने पेमेंट कधी मिळणार याची वाट पाहत लागावी नाही.त्यामुळे आपण सगळ्याचे मिळून डेअरी चे दूध उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करूया असे मनोगत व्यक्त केले
गणेश चतुर्थीनिमित आपल्या संस्थेच्या सर्व सभासदांना संस्थेच्या नवीन इमारती मध्ये भेटवस्तू वाटप करण्यात आले.
सर्व शेतकऱ्यांनी डेअरीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.


