सावंतवाडी : येथील सामाजिक कार्यकर्ते व नेहमीच रक्तदान करून समाजात आदर्श असे कार्य करणारे युवा रक्तदाता संघटनेने पुन्हा एकदा आपल्या आदर्श अशा समाजकार्याची झलक दाखवली आहे.
सविस्तर वृत्त असे की, आज बांदा येथील अजित केसरकर या रुग्णाला गोवा बांबोळी येथील रुग्णालयमध्ये हृदयाच्या ऑपरेशन दरम्यान ओ-पॉझिटिव्ह (O+) या रक्त गटाच्या ५ रक्त पिशवींची अत्यंत तातडीची आवश्यकता होती.
दरम्यान, देव्या सूर्याजी यांच्या युवा रक्तदाता ग्रुपचे प्रभाकर वडार, अनिकेत सावंत, ज्ञानेश्वर राणे, अक्षय पंडीत, अमिर खान यांनी सावंतवाडी येथून गोवा – बांबोळी रुग्णालयमध्ये जाऊन रक्तदान केले.
सद्या ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण झाले असून रुग्णाची तब्येतही सुखरूप आहे.
युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून अशा विधायक कार्याची पुन्हा एकदा सावंतवाडी आणि सिंधुदुर्गवासीयांना प्रचिती आली आहे. विविध समाज माध्यमातून या युवकांचे अभिनंदन होत असून अनेकांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.


