मुंबई : ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी हलगी काय वाजवता, आमच्याकडे नगरा आहे नगरा असे वक्तव्य केले होते. मराठा समाजाने नगारा काय असतो हे कालच्या गर्दीतून दाखवून दिले. मराठा मोर्चा गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडण्याची शक्यता दिसत आहे. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठा समाज मुंबईत धडकणार आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा रात्री उशीरा मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच राज्याच्या राजधानीत बड्या घडामोडी घडत आहेत.काल मनोज जरांगे पाटील जुन्नर मध्ये दाखल झाले. रात्रभर ठीक ठिकाणी जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले. रात्री 9 वाजेनंतर मनोज जरांगे पाटील जुन्नर मध्ये मुक्कांच्या ठिकाणी दाखल झाले. जुन्नर मधील शिवाजी चौकात जरांगे पाटील यांचे सकल मराठा बांधवाकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. किल्ले शिवनेरीवर आज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून जरांगे पाटील आता मुंबईकडे कूच करतील. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षण आणि इतर मागण्यासाठी मुबंई जात असताना अहिल्यानगर पोहतील आणि ते या ठिकाणी मराठा समाज बांधवशी संवाद साधतील.

आझाद मैदानावर मराठा बांधव –
मुंबईच्या आझाद मैदानात हळूहळू आंदोलन येण्यास सुरुवात झाली आहे. मोठ्या संख्येने मराठा बांधव आझाद मैदानाकडे येत आहे. मोर्चामधील गर्दी आतापर्यंतचे सर्व उच्चांक मोडण्याची शक्यता आहे. आझाद मैदानात जमलेल्या आंदोलकाकडून घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव राज्याच्या कानाकोपऱ्यातून आझाद मैदानात दाखल होत आहे. विशेष म्हणजे या मोर्चात ओबीसी आणि मुस्लिम बांधवांचा समावेश आहे.
20 अटींचे हमीपत्र –
मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानात अटी आणि शर्तींवर आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे. 20 अटी घालण्यात आल्याची माहिती समोर आहे. त्याआधारे परवानगी देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी हमीपत्र दिले आहे. आझाद मैदानात 5000 आंदोलक बसू शकतात. त्यामुळे ज्या संख्येने मराठा बांधव मुंबईत येत आहे. त्यांना राज्य सरकार मुंबई बाहेर थांबवणार का असा सवाल समोर येत आहे.
बेमुदत आंदोलनावर ठाम –
मनोज जरांगे पाटील यांनी हमीपत्र दिले असले तरी ते बेमुदत आंदोलनावर ठाम आहेत. तर मुंबई पोलिसांनी त्यांना आंदोलनासाठी एकाच दिवसाची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी आझाद मैदानात स्वयंपाक करता येणार नाही, कचरा करता येणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तरी आंदोलन बेकायदेशीर ठरवून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
इतिहास शिव्यांना नाही, कर्तृत्वाला लक्षात ठेवतो –
मराठा आरक्षणावरून दादर स्टेशन परिसरात राजकीय बॅनरबाजी दिसून आली. मनोज जरांगेंच्या मुंबई कूचदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या समर्थनाचे बॅनर लागले आहेत. या बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा फोटोसह “इतिहास शिव्यांना नाही, कर्तृत्वाला लक्षात ठेवतो” असा मजकूर लिहिला आहे. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे फडणवीस, असा दावाही बॅनरवर करण्यात आला आहे.
भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, नरेंद्र पाटील यांच्याकडून बॅनर लावण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिकेत!, मुंबईकडे कूच सुरू असून 29 ऑगस्टला आझाद मैदानावर जरांगे पाटलांचे उपोषण सुरू होईल. सकाळी 11 वाजेपासून उपोषणाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.


