Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा धडकला मुंबईत, जोरदार शक्तीप्रदर्शन! ; लाखो मराठा बांधव आझाद मैदानात.

मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झाले आहेत. सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटलांची समजूत काढण्यात अपयशी ठरले. जरांगे पाटील हे ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. मागील काही दिवसांपासून ते ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी उपोषण करताना दिसत आहेत. आता त्यांनी थेट मुंबई गाठली आहे. दुसरीकडे ओबीसींचा या आरक्षणाला विरोध आहे. जर मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळाले तर तो आमच्यावर मोठा अन्याय आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा ओबीसी महासंघाने दिलाय. आझाद मैदानावर जरांगे पाटील यांना फक्त आज आंदोलनासाठी परवानगी मिळाली आहे.

आझाद मैदानावर मोठा पोलिस बंदोबस्त हा बघायला मिळतोय. आंदोलक हे मोठ्या संख्येने आझाद मैदानावर पोहोचले आहेत. पोलिसांनी काही नियम आणि अटी लावून या आंदोलनाला परवानगी दिली आहे. मोठा ताफा घेऊन जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झाले आहेत. पोलिसांनी पाच हजार लोकांच्या परवानगी या आंदोलनासाठी दिली आहे. मनोज जरांगे पाटील हे जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुंबईत दाखल झाल्याचे बघायला मिळतंय. कालच त्यांनी स्पष्ट केले की, गोळ्या झाडल्या तरीही आम्ही मागे फिरणार नाहीत.

आझाद मैदानावरील गर्दी ही चांगलीच वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. पोलिसांनी आझाद मैदानावर स्वयंपाक करण्यास मनाई केली आहे. मात्र, काही गाड्यांमध्ये स्वयंपाकाचे साहित्य आझाद मैदानाच्या परिसरात दाखल झाले आहे. जरांगे पाटील यांनी अगोदरच समाजातील लोकांना काही सुचना दिल्या आहेत. लाखो मराठा बांधव हे मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चात सहभागी झाल्याचे बघायला मिळत आहे. आझाद मैदानावर हळूहळू करून लोक पोहोचताना दिसत आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाकडे संपूर्ण राज्याच्या नजरा लागल्या आहेत. सरकारने जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जरांगे पाटील हे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना जरांगे पाटील हे दिसले होते. या आंदोलनाला फक्त आजचीच परवानगी आहे. आज दिवसभरात नेमके काय काय घडते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. कालच जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, आमच्या मागण्या जोपर्यंत पुर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही उपोषण करणार आहोत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles