कुडाळ : बांव ग्रामोन्नती मंडळ, मुंबई मार्फत सोमवार १ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता, जि. प. पू. प्रा. शाळा बांव, ता. कुडाळमध्ये तसेच सिंधुदुर्ग प्रबोधिनी मार्फत बुधवार, ३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता, शांताराम विष्णू कुलकर्णी माध्यमिक विद्यामंदिर मोंड, ता. देवगडमध्ये निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शक व प्रमुख वक्ता, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्याचे भूमिपुत्र, उच्चविद्याविभूषित केंद्र शासनाचे अधिकारी, ‘तिमिरातूनी तेजाकडे’ या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते सत्यवान यशवंत रेडकर हे विद्यार्थ्यांना ३५९-३६० वे निःशुल्क मार्गदर्शन प्रदान करणार आहेत. उत्सवाची धामधुम असली तरी कोकण बोर्ड फक्त गुणपत्रिकेतील टक्केवारी व बोर्डात अव्वल स्थानावर मर्यादित न राहता राज्य/केंद्र शासन/बॅंका आदि विभागात प्रशासकीय पदांवर हवेत व त्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षण प्रेमींनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. कोणतेही रजिस्ट्रेशन शुल्क नसून फक्त वही व पेन सोबत असू द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


