नवी दिल्ली : भारताने आशिया हॉकी कप 2025 स्पर्धेत कमाल केली आहे. एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठली आहे. भारताने नवव्यांदा आशिया कप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. आशिया हॉकी कप स्पर्धेत सर्वाधिक वेळा अंतिम फेरी गाठण्याचा मान देखील टीम इंडियाला मिळाला आहे. सुपर 4 फेरीतील तिसऱ्या सामन्यात भारत आणि चीन हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने चीनला डोकं वर काढूच दिलं नाही. भारताने सुरुवातीपासूनच या सामन्यावर पकड मिळवली होती. पहिल्या सत्रात शिलानंद लाक्राने 3.38 व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर 6.26 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर दिलप्रीत सिंगने त्याचे गोलमध्ये रूपांतर केले. 7.51 व्या मिनिटाला भारताने पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. राजकुमार पाल 36.16 व्या मिनिटाला याने मैदानी गोल मारला आणि 4-0 ने आघाडी मिळवली. त्यानंतर 38 व्या मिनिटाला सुखजीतने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले आणि चीन पूर्णपणे बॅकफूटवर गेला.
भारतीय संघाने नवव्यांदा आशिया कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता चौथ्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी दक्षिण कोरियाशी स्पर्धा करेल.


