Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटलांची ‘सिंघम स्टाईल’ कारवाई! ; सावंतवाडी पोलिसांचे जुगार अड्ड्यावर धडक सत्र सुरूच !, जुगार मटक्यावाल्यांचे धावे दणाणले!

सावंतवाडी : गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळवून होळीचा खुंट पांगम गल्ली सावंतवाडी येथे जुगार अड्ड्यावर पहाटे 04.30 वाजता छापा टाकला. तीन इसम मिळाले बाकीचे पोलिसांची चाहूल लागल्याने पळून गेले. पळून गेलेल्यांचा शोध सुरू आहे. मिळून आलेले इसमामध्ये जुगार अड्ड्याचा चालक हेमंत शामराव रंकाळे व रोहन लहू पाटील (वय 22 , राहणार जिमखाना सावंतवाडी), पांडू बापू पवार (वय 55 वर्षे., राहणार शिरोडा., तालुका वेंगुर्ला सध्या राहणार दळवी हॉटेल) असे आहेत. त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
जागीच मिळून आलेला मुद्देमाल कॅट, जुगारासाठी वापरलेले पैसे, जुगाराचा पाल, तसेच त्यांचे मोबाईल असा एकूण 35,000/ रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, माधुरी मुळीक, पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे, पोलीस शिपाई संभाजी पाटील, (चालक) चव्हाण त्यांनी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे

आरोपी
1. हेमंत शामराव रंकाळे वय 35 वर्षे. राहणार न्यू खासकील वाडा . सावंतवाडी.
2.रोहन लहू पाटील .वय 22 राहणार जिमखाना सावंतवाडी.
3.पांडू बापू पवार व 55 वर्षे. राहणार शिरोडा. तालुका वेंगुर्ला सध्या राहणार दळवी हॉटेल . जिमखाना सावंतवाडी
आरोपी क्रमांक १ हा क्रमांक २ व ३ यांना घेऊन होळीचा खुंट, पांगम गल्ली, या ठिकाणी एका उघड्या शेडमध्ये प्लास्टिक कागदाचा आडोसा करून त्यामध्ये पत्त्याचा अंदर बाहर जुगार खेळ खेळविताना मिळून आला. त्यामध्ये
३ मोबाईल, १३,२५० रुपये रोख रक्कम, पत्ते असे एकूण ३५,०००/- रुपयेचे जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
अधिक तपास पोहवा./174 धुरी सावंतवाडी पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, माधुरी मुळीक, पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे, पोलीस शिपाई संभाजी पाटील, (चालक) चव्हाण त्यांनी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles