Saturday, November 8, 2025

Buy now

spot_img

निगुडे ग्रामपंचायतचा भोंगळ व मनमानी कारभार!, जनमाहिती अधिकारी, सरपंच यांची जाणीवपूर्वक अर्धवट माहिती! ; सामाजिक कार्यकर्ते संतोष राणे यांचा आरोप.

बांदा : निगुडे ग्रामपंचायतमध्ये माहिती अधिकाराखाली माहिती मागवण्यात आली होती या माहितीमध्ये नळ पाणी पुरवठा पाणी बिल विलंब आकार तसेच युनिट दर वाढ व दरवाढ कमी यासंदर्भात माहिती मागवण्यात आली होती परंतु सदर माहिती ग्रामसेविका तथा जनमाहिती अधिकारी श्रीम.अक्षता गोसावी व सरपंच श्री लक्ष्मण निगुडकर यांनी संगनमत करून अर्धवट व खोडसाळ माहिती दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष राणे यांनी केला आहे . तसेच पाणी बिलाचे जुने दर ११ रुपये प्रती युनिट हे दर ग्रामपंचायत साठी नुकसानीचे व नविन दर ७ रुपये प्रती युनिट हे दर फायद्याचे म्हटले आहेत मग त्यावेळी नळयोजना लाईट बिल हे नळयोजनेच्या फंडातून भरल जात होत व आज नळकामगाराचा पगार द्यायला पैसे नाहीत व लाईट बिल १५ वित्त आयोगातून भरल जातयं . हा फायदा . आता हे शिक्षण कुठे भेटत याची चौकशी करावी लागेल. हा शिक्षणाचा अपमान नाही का ? तसेच ग्रामपंचायत कडून सर्व नळधारक यांचेवर पाणी चोरी सारखा गंभीर आरोप लेखी स्वरूपात करणेत आलेला आहे . याची संबंधीत यंत्रणेने योग्य दखल न घेतल्यास मा .पालकमंत्री महोदय यांची भेट घेवून निवेदन देणार आहे . त्यानंतर सरपंच व ग्रामसेवक यांचे विरुद्ध कोर्टात अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे संतोष राणे प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले . तसेच दोन्ही व्यक्तीच्या निलंबनाची देखील मागणी करणार असल्याचे त्यांनी आपल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles