मालवण : क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी रेकोबा हायस्कूल, मालवण येथे संपन्न झालेल्या 19 वर्षाखालील मुलांच्या तालुकास्तरीय खो – खो क्रीडा प्रकारात स.का.पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलांचा संघ वराडकर हायस्कूल,कट्टा च्या संघाला नमवून विजयी झाला असून जिल्हास्तरावर मालवण तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
सदर संघात चिन्मय मेस्त, सिद्धेश करंगुटकर, देवेश गावकर, यश कोळंबकर, शुभम लुडबे, हरिश्चंद्र देऊलकर, मयुर बागवे, सुरज आळवे, तुषार आढाव, ओम मिठबावकर, सुयश कदम, जतीन करंगुटकर, राज लाड यांचा समावेश होतो.यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवराम ठाकूर, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. साईनाथ चव्हाण, सचिव श्री. चंद्रशेखर कुशे यांनी अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर संघास सागर सावंत यांचे क्रीडा मार्गदर्शन लाभले.