सावंतवाडी : तालुक्यातील रोणापाल गावची तंटामुक्ती गाव समिती आज रोणापाल ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या ग्रामसभेत गठित करण्यात आली. यावेळी उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांनी गावात सामाजिक पातळीवर सक्रिय सहभाग असणारे श्री सुदिन मोहन गावडे यांची तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी बिनविरोध निकेली. यावेळी सभेत उपस्थित ग्रामस्थ श्री. चंद्रकांत सावंत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित तंटामुक्ती समिती अध्यक्ष यांचे स्वागत व अभिनंदन सर्व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. यावेळी रोणापाल गावचे उपसरपंच योगेश केणी, पोलीस पाटील निर्जरा परब, ग्रामपंचायत अधिकारी सौ. आळवे, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर नेमण, कृष्णा परब, सौ. गावडे व ग्रामस्थ श्री चंद्रकांत सावंत, विष्णु तुयेकर, मंगेश गावडे, उदय देऊलकर, राजन परब, विष्णु सावंत, अरुण परब, श्रीमती पवार, उमेश पेडणेकर, कृष्णा केणी, अरुण केणी व ग्रामपंचायत शिपाई रमेश देऊलकर उपस्थित होते.
अभिनंदनीय! – सामाजिक कार्यकर्ते सुदिन गावडे यांची रोणापाल गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी बिनविरोध निवड!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]