सावंतवाडी : येथील प्रवीण पुरुषोत्तम देऊळकर (वय 34, राह. घर नं. 182, कळसुकर शाळेच्या मागे, जुना बाजार सावंतवाडी) याचेवर सन 2021 पासून दारू वाहतुकीचे विविध 5 गुन्हे दाखल होते.
सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार त्याच्यावर हद्दपारचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनोद कांबळे यांच्यामार्फत उपविभागीय दंडाधिकारी सावंतवाडी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यावर सुनावणी होऊन नमूद इसमास सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 6 महिना करता हद्दपार करण्याबाबतचा आदेश प्राप्त झाले . सदर आदेशाची अंमलबजावणी करून आज दिनांक 16/9/2025, रोजी हद्दपार इसम प्रवीण देऊळकर यास गोवा राज्यात मोपा पोलीस ठाणे हद्दीत त्याच्या नियोजित निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात हद्दपार करण्यात आले आहे. त्यास हवालदार श्री. धुरी व पो.कॉ. भूषण भोवर यांनी जिल्ह्याबाहेर पाठवून कारवाई पूर्ण केली आहे.
सावंतवाडीतील प्रवीण देऊळकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ६ महिन्यांसाठी हद्दपार.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


