सावंतवाडी : तालुक्यातील बसत्याव घोन्सालवीस उर्फ बंटी. (रा. होडावडा ता. वेंगुर्ला), आजू उर्फ तुकाराम नाईक (रा. किनळे ता. सावंतवाडी) हे आज १६/९/२६ रोजी सकाळी ०७.०० वाजण्याच्या सुमारास किनळे माऊली मंदिर स्टॉप नजीक मेन रोड वर रस्त्यावर बलेनो गाडी क्रमांक MH07/AG/9737 मध्ये गोवा बनावटीचे विविध ब्रॅण्डची 54 बॉक्स दारू सुमारे 3,56,000 रुपये किंमतीची दारू वाहतूक करीत असताना मिळून आले 8,00,000/- रुपये किंमतीची बलेनो असा एकूण 11,56,000 किमतीचा माल जप्त केला आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महेश अरवारी महेश अरवारी हे करीत आहेत.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम व यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचे पथक एएसआय श्री. राठोड, हवालदार डिसोजा, तवटे, आशिष जामदार, पो कॉ. समजिस्कर यांनी केली आहे.
अवैध दारु विकणाऱ्या दोन्ही तरुणांना अटक, तब्बल ११ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त.! ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दमदार कामगिरी.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


