सावंतवाडी : तालुक्यातील सातार्डा ग्रामपंचायतीने 15व्या वित्त आयोगांतर्गत गावातील उपआरोग्य केंद्राला विविध अत्यावश्यक औषधे आणि आरोग्य किटचे वाटप केले. सरपंच संदीप उर्फ बाळू प्रभू यांच्या हस्ते ही औषधे सुपूर्द करण्यात आली.
औषध वाटप समारंभ सातार्डा येथील उपआरोग्य केंद्राचे डॉ. एमगेकर आणि आरोग्य सेविका दिपाली परब यांनी ही औषधे स्वीकारली. यावेळी ग्रामसेवक कुणाल मस्के, माजी सरपंच उदय पारिपत्ते, ग्रामपंचायत सदस्य उत्कर्ष पेडणेकर, शर्मिला मांजरेकर, वासुदेव राऊळ, विनिता गोवेकर यांच्यासह सगुण गोवेकर, संतोष गोवेकर, संजय पवार, सोनू पवार, संतोष पवार, योगेश गोवेकर, अशोक जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

(सातार्डा – सरपंच संदीप उर्फ बाळू प्रभू यांच्या हस्ते उप आरोग्य केंद्राचे डॉ. एमगेकर यांना औषधे सुपूर्त करताना सोबत रुग्णसेविका दिपाली परब, उदय पारिपत्ते, शर्मिला मांजरेकर, उत्कर्ष पेडणेकर, वासुदेव राऊळ, विनिता गोवेकर, सगुण गोवेकर, संतोष गोवेकर व ग्रामस्थ.)
ग्रामपंचायतीच्या या पुढाकारामुळे गावातील आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास सरपंच प्रभू यांनी व्यक्त केला.


