दोडामार्ग : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोडामार्ग येथील उपविभाग कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उद्या गुरुवारी, दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे हे विशेष उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आमदार नितेश राणे तसेच जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे (भा.प्र.से.), कोकण प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज आदी उपस्थित राहतील.
तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता श्रीमती पुजा इंगवले, उपविभागीय अधिकारी दोडामार्ग श्रीमती सीमा गोवेकर, कनिष्ठ अभियंता संभाजी घंटे यांनी केले आहे. कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक बांधकाम उपविभाग, दोडामार्ग यांनी केले आहे.


