सावंतवाडी : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियान हे ग्रामविकासासाठी वरदान ठरणार असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनासोबतच जनतेची ही सहकार्य तेवढेच गरजेचे आहे असे मत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केले आजगाव येथे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते ऑनलाईन मार्गदर्शन करताना म्हणाले.


आजगाव येथे आयोजित कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खेबुडकर उपस्थित होते. त्यावेळी व्यासपीठावर सरपंच श्रीमती यशस्वी सौदागर, ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांसह अन्य उपस्थित होते.
या वेळी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन तसेच आजगाव ग्राम पंचायत च्या वेबसाईट चे उद्घाटन देखील श्री. खेबुडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार तथा माजी शिक्षण मंत्री दीप केसरकर यांनी zoom मीटिंग द्वारे आजगाव ग्रामपंचायत टीम आणि ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला आणि अभियान यशस्वी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या स्वागताने तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या , संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून, दीपप्रज्वलनाने करण्यात आली .
यावेळी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अमित मेश्राम, गट विकास अधिकारी, पंचायत समिती सावंतवाडीचे वासुदेव नाईक,आजगाव सरपंच यशश्री सौदागर, उपसरपंच सुशील कामटेकर, तालुका समन्वयक अंकुश जंगले, कृषी अधिकारी पंचायत समिती सावंतवाडी शुभदा कविटकर, आजगाव – धाकोरे ग्राम महसूल अधिकारी नागराज चंद्रपगोळ, मंडळ अधिकारी, आजगाव मंडळ कैलास गावडे, प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम मस्के, माजी केंद्र प्रमुख विलासानंद मठकर ,शिक्षक दत्तगुरु कांबळी, ग्रामपंचायत अधिकारी संदीप गवस उपस्थित होते.
कार्यक्रमात खेबुडकर यांच्या हस्ते घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात चावी तसेच आबा कार्ड देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी शुभदा कविटकर यांनी केले. तर आभार सरपंच यशश्री सौदागर यांनी मानले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


