Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

यूएईला पराभूत करत पाकिस्तान ‘Super 4’ मध्ये! ; टीम इंडिया विरुद्ध पुन्हा भिडणार!

दुबई : आशिया कप 2025 स्पर्धेतील 10 व्या सामन्यात पाकिस्तानने यजमान यूएईवर 41 धावांनी मात करत साखळी फेरीतील आपला दुसरा विजय मिळवला आहे. पाकिस्तानने यूएईला 147 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यामुळे यूएई हे विजयी आव्हान पूर्ण करत उलटफेर करेल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर यूएईला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. पाकिस्तानने यूएईला 17.4 ओव्हरमध्ये 105 रन्सवर ऑलआऊट केलं. पाकिस्तान या विजयासह बी ग्रुपमधून टीम इंडियानंतर सुपर 4 मध्ये प्रवेश करणारी दुसरी टीम ठरली आहे. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात साखळी फेरीनंतर सुपर 4 मध्ये लढत होणार आहे.

यूएईची बॅटिंग –

यूएईकडून विजयी धावांचा पाठलाग करताना कुणालाही मोठी खेळी करता आली नाही. अलिशान शराफू आणि कॅप्टन मुहम्मद वसीम या सलामी जोडीने स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे या दोघांकडून दमदार सुरुवातीची आशा होती. मात्र सलामी जोडीने निराशा केली. अलिशान याने 12 तर मुहम्मदने 14 धावा केल्या.

राहुल चोप्रा आणि ध्रुव परासर या दोघांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र दोघांना या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. राहुल चोप्रा याने 35 बॉलमध्ये 35 धावा केल्या. तर ध्रुवने 23 चेंडूत 20 धावांचं योगदान दिलं. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. पाकिस्तानसाठी एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी 5 गोलंदाजांना यश मिळालं. हरीस रऊफ, अब्रार अहमद आणि शाहिन आफ्रिदी या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर सॅम अयुब आणि कॅप्टन सलमान आघा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

पहिल्या डावात काय झालं?

यूएईने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानसाठी फखर झमान याने सर्वाधिक 50 धावा केल्या. कॅप्टन सलमान आघा याने 20 धावा जोडल्या. तर इतर फलंदाज निष्प्रभ ठरले. त्यामुळे यूएईचं सामन्यावर नियत्रंण होतं. मात्र अखेरच्या क्षणी शाहिन आफ्रिदी आणि मोहम्मद हारीस या दोघांनी निर्णायक खेळी केली. हारीसने 14 बॉलमध्ये 18 रन्स केल्या. तर शाहीनने 14 चेंडूत 2 सिक्स आणि 4 फोरच्या मदतीने नॉट आऊट 29 रन्स केल्या. त्यामुळे पाकिस्तानला 146 धावांपर्यंत पोहचता आलं. हारीस आणि आफ्रिदी या दोघांनी केलेल्या धावा पाकिस्तानला विजयी करण्यात निर्णायक ठरल्या.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles