बंगळुरु : कर्नाटकच्या बंगळुरुमध्ये एक हैराण करुन सोडणारं प्रकरण समोर आलय. इथे एका योग गुरुवर अल्पवयीन मुलीसह 8 महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप झाला आहे. एक पीडित अल्पवयीन मुलीने योग गुरु निरंजन मूर्ती विरोधात राजराजेश्वरी नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. आरोपी योग गुरुला अटक झाली आहे. प्रकरणात पुढील चौकशी सुरु आहे.
मेडीकल नंतर बलात्कार झाल्याच स्पष्ट –
आपल्या वासनेचे शिकार बनवलं –
पोलिसांनी सांगितलं की, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी आता त्याला शोधून अटक केली आहे. चौकशीत समजलं की, त्याने मुलीवर बलात्कार केला. माहिती मिळालीय की, आरोपीने अन्य निरपराध मुली आणि महिलांना सुद्धा आपल्या वासनेचे शिकार बनवलं. पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनी निर्देश दिलेत की, या योग गुरुने अन्य कोणाच लैंगिक शोषण किंवा बलात्कार केला असेल, तर त्यांनी राजेश्वरी नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तक्रारकर्त्याची माहिती गोपनीय ठेवली जाईल.
लेक्चररचा विद्यार्थीनीवर बलात्कार
मिळालेल्या माहितीनुसार, योग गुरु निरंजन मूर्ती राजराजेश्वरी नगरात एक योग केंद्र चालवायचा. योग गुरु निरंजन मूर्तीवर योग केंद्रात येणाऱ्या आठ महिला यात युवती सुद्धा आहेत, त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.


