सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने सावंतवाडी तालुकास्तरीय खो- खो स्पर्धा शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी नेमळे येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत १७ वर्षे वयोगटाखालील स्पर्धेतील अंतिम सामना रंगला तो कळसुलकर हायस्कूल विरुद्ध आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल. यात आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल संघ अंतिम विजेता ठरला.
या संघाला शाळेचे क्रीडाशिक्षक अनिल नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या संघाचे संस्थाध्यक्ष रोहिदास सावंत, उपाध्यक्ष निलेश परब, सेक्रेटरी राजन नाईक, संस्थेचे पदाधिकारी, प्रशाळेचे मुख्याध्यापक शिरीष नाईक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


