सावंतवाडी : तथागत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग ही संस्था जिह्यात अल्पावधीत नावारूपास आली असून, बौद्ध समाज बांधवांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पतपेढीच्या माध्यमातून सहकारात पाय रोवण्याचे काम केलं आहे. बौद्ध बांधवांनी आम्ही लावलेल्या रोपट्याच रूपांतर वटवृक्षात करण्याचा प्रयत्न करावा आणि आपला आपला उत्कर्ष साधावा.” असे भावपूर्ण उद्गार संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजू यांनी संस्थेच्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना मार्गदर्शन करताना केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध बांधवांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या तथागत नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सिंधुदुर्ग या सहकारी संस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच शनिवार दि.२० सप्टेंबर २०२५ रोजी कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष श्री अरविंद वळंजू यांच्या अध्यक्षेखाली संपन्न झाली.
या वार्षिक सभेला संस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत कदम, संचालक मोहन जाधव, भास्कर जाधव, रमेश कदम, मिलिंद जाधव, संचालिका सौ. रुपाली पेंडुरकर, सौ. श्रध्दा कदम,संचालक मिलिंद सर्पे, के. एस. कदम, सिद्धार्थ कदम, कांता जाधव, प्रमोद कासले, संस्थेचे सचिव व कार्यलक्षी संचालक सुनील कदम आदी मान्यवर संचालकांसह सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी डी. के. पडेलकर, प. पू. भालचंद्र महाराज नागरी सह. पतसंस्था मर्या. खारेपाटण या संस्थेचे संचालक व पत्रकार संतोष पाटणकर, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक संजय पेंडुरकर, जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी अजित कदम, भीमराव कदम यांच्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी संस्थेचे सचिव सुनील कदम यांनी सभेला उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत करून सभेला रीतसर सुरवात केली. यावेळी संस्थेसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तन्य संचालक प्रमोद कासले, व्यवस्थापक सुनील कदम, उद्योजक रोहन कदम, ठेवीदार राजेंद्र कदम या सभासदांचा संस्थेच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेने अल्पावधीत पहिला वार्षिक अहवाल काढून उत्कर्ष कामकाज करून सभासदांचा विश्वास संपादन केल्याबद्दल संस्थेच्या संचालक मंडळाचे अभिनंदनयुक्त ठराव डी. के. पडेलकर यांनी मांडला. व काही सूचना उपयुक्त विधायक सूचना देखील संचालक मंडळाला केल्या.

“सदर संस्था आपली आहे. ही भावना मनात रुजवून सभादानी जास्तीत जास्त ठेवी संस्थेत ठेऊन संस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन करून भविष्यात संस्थेला संगणक प्रणालीशी जोडून या सभासदांना आधुनिक तांत्रिक चांगल्या सुविधा देण्याचा संस्थेचा मनोदय असल्याचे देखील यावेळी अध्यक्षीय भाषणांत संस्थेचे चेअरमन अरविंद वळंजू यांनी सांगितले.”
या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष श्री सूर्यकांत कदम, संचालक श्री प्रमोद कासले यांनी देखील सभासदांना मार्गदर्शन केले.या सभेला मोठ्या संख्येने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागातील सभासद उपस्थित होते.तर वार्षिक सभेच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक सुनील कदम यांनी केले. सूत्रसंचलन संस्थेचे संचालक श्री मोहन जाधव यांनी केले तर आभार संस्थेच्या संचालिका सौ श्रध्दा कदम यांनी मानले.शेवटी राष्ट्रगीताने वार्षिक सभेची सांगता करण्यात आली यावेळी जिल्ह्यातील भागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो – तथागत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्गच्या १ ल्या वार्षिक सर्वसाधारण सभेस मार्गदर्शन करताना संस्थेचे चेअरमन अरविंद वळंजू, बाजूला उपाध्यक्ष सूर्यकांत कदम, संचालक भास्कर जाधव, मोहन जाधव व अन्य संचालक उपस्थित होते.
छाया – संतोष पाटणकर.
_________


