सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या “सेवा पंधरवडा – आरोग्य आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत डिजिटल फिरता दवाखान्याचे आयोजन माडखोल शाळा क्र. १ येथे करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन भाजप युवा नेते विशाल परब यांच्या सौजन्याने करण्यात आले.

या आरोग्य उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगांवकर, माडखोल देवस्थान मानकरी दत्ताराम राऊळ, चंद्रकांत म्हालटकर, आनंद राऊळ (दांडेकर), माडखोल उपसरपंच तथा सोसायटी चेअरमन कृष्णा (जीजी) राऊळ, आंबोली मंडल सरचिटणीस संजय शिरसाट, युवा मोर्चा आंबोली मंडलचे निलेश पास्ते, माडखोल माजी सरपंच संजय राऊळ, माजी उपसरपंच शिवाजी परब, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंडल कार्यकारिणी सदस्य दत्ताराम कोळमेकर, वेर्ले बूथ अध्यक्ष राजन राणे, महिला कार्यकर्त्या मृणाली राणे, माडखोल युवा मोर्चा अध्यक्ष विनेश तावडे, तसेच युवा कार्यकर्ते स्वप्नील राऊळ, रुमेश (पिन्या) ठाकूर, बंटी सावंत, गुरु राऊळ, अभय माडखोलकर, आयुष नाईक, नंदू जाधव, लखन आडेलकर, न्हानू राऊळ, रवी चव्हाण, गौरेश झेमणे, अवी झेमणे, बाबल्या सावंत, प्रशांत माडखोलकर, सागर आडेलकर, बापू राऊळ, सागर सावंत (ओवळीये बूथ अध्यक्ष ), माडखोल शाळा न. १ व्यवस्थापन अध्यक्ष आनंद राऊळ, माडखोल-धवडकी शाळा नं. २ व्यवस्थापन अध्यक्ष अमित राऊळ आदी कार्यकर्ते व असंख्य जिल्हा परिषद मतदार संघातील असंख्य महिलांनी, ग्रामस्थांनी सहभाग घेतला. यावेळी अनेक युवक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास माडखोल शाळा नं. १ चे व्यवस्थापन अध्यक्ष आनंद राऊळ व माडखोल-धवडकी शाळा नं. २ चे व्यवस्थापन अध्यक्ष अमित राऊळ यांचाही मोलाचा सहभाग लाभला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागात आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होत असून, ग्रामस्थांनी या सेवेला भरभरून प्रतिसाद दिला


