सावंतवाडी : सावंतवाडी पोलिसांना प्राप्त गोपनीय माहितीवरून बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी कोल्हापूर येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ९ लाख ५७ हजारच्या दारूसह कार जप्त करण्यात आली आहे. वाहन क्र. MH09/FV/8406 या वाहनाचे सीट कव्हर खाली कप्पे करून 57,600 रुपयाची गोवा बनावटीची दारू(१४४ bottles) चालक महेश आप्पा पाटील वय 35 व रोहन मानसिंग केंगारे वय 31 दोन्ही ,राह. हुपरी, तालुका – हातकणंगले, जिल्हा – कोल्हापूर, हे गोवा ते कोल्हापूर अशी वाहतूक करताना माजगाव गरड याठिकाणी मिळून आले.


9,00,000 रुपयाचे एर्टिगा वाहन व 57,600 रुपयाची दारू असा एकूण 9,57,600 रुपेचा माल जप्त केला असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर, अनिल धुरी, महेश जाधव यांनी केली आहे.


