दुबई : टीम इंडियाने आशिया कप 2025 मध्ये धमाक्यात सुरूवात केली. सुपर 4 फेरीत रविवारी 21 सप्टेंबरला 6 विकेट्सने मात करत फायनलच्या दिशेने पाऊल टाकले. मात्र, भारत-पाकिस्तान सामन्यात मोठ्या घटना बघायला मिळाल्या. हेच नाही तर पाकिस्तानी क्रिकेटर भारताच्या खेळाडूंना डवचण्याचा प्रयत्न करताना दिसले. मग काय भारतीय खेळाडूंनी चांगलाच इंगा पाकिस्तानच्या खेळाडूंना दाखवला. भारतीय प्रेक्षकांकडून पाकिस्तान संंघावर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे. पाकिस्तान संघाचा खेळाडू साहिबझादा फरहान याने टीम इंडिया विरुद्ध सर्वाधिक 58 धावा केल्या आणि त्यानंतर त्याने बॅटने थेट फायरिंग करण्याची एक्शन केले. अभिषेक शर्मा यानेही पाकिस्तान खेळाडूंना त्यांच्या वागण्यावरून थेट शिवी घातली.
आशिया कप 2025 मध्ये भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा पाकिस्तान संघाला धूळ चारली. त्यामध्ये मैदानात पाकिस्तान संघाचा मोठा थयथयाट बघायला मिळाला. कारण नसताना पाकिस्तानचे खेळाडू भारतीय खेळाडूंसोबत पंगे घेताना दिसले. पाकिस्तानच्या गोलंदाजांना अभिषेक शर्मा याने चांगलेच धुतले आणि यानंतर मैदानात मोठा राडा बघायला मिळाला. पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी 105 धावांची भागिदारी केली. भारतीय संघाची ही कामगिरी पाहून पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू शोएब अख्तर याने थेट लाईव्ह शोमध्येच धक्कादायक प्रतिक्रिया दिली. हेच नाही तर त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांवर टीका केली. पाकिस्तान संघाच्या गोलंदाजांच्या नेमक्या चुका काय काय झाल्या याचा पाडाच त्याने वाचून दाखवला. याप्रमाणे खेळल्यावर पाकिस्तान संघ हा भारतीय संघासमोर टीकूच शकत नसल्याचे स्पष्ट म्हटले.
पाकिस्तान संघाला अगोदर भारतीय संघाने धुतले आणि त्यानंतर लाईव्ह शोमध्ये थेट शोएब अख्तर याने. पाकिस्तान संघाला या सामन्यात लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. शिवाय त्यांनी केलेल्या कृत्यामुळे ते टीकेची धनी देखील ठरले आहेत. या सामन्याातील अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. भारतावर करण्यात आलेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तान संघासोबत सामना खेळू नये, अशी मागणी भारतातून केली जात होती.


