बांदा : श्रीमती चंद्राबाई कलाप्पा म्हेत्री मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट हलकर्णी , कोल्हापूर व शिक्षण प्रसारक मंडळ, बांदा गोगटे– वाळके कॉलेज, बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने “चंद्रकला करंडक” राज्यस्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन २५ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आले आहे. वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या विविध सामाजिक प्रश्नावर ती विचारमंथन व्हावे वक्त्यांनी विचारपीठावर निर्भीड व सडेतोड विचारांची मांडणी करावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करीत असल्याची माहिती श्रीमती चंद्राबाई कलाप्पा म्हेत्री मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. डॉ. किशोर कल्लाप्पा म्हेत्री यांनी दिली .
या स्पर्धेमध्ये राज्यभरातील शालेय विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.
या वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय पुढीलप्रमाणे देण्यात आले आहेत.
१ शिक्षणातून मला काय हवे ?
२.सुजाण पालकत्व : वास्तव आणि अपेक्षा
३. भारतीय पारंपरिक खेळ : अंस्तगत होत आहेत का?
४. माझ्या संकल्पनेतील आदर्श गाव
५.व्यसन सोशल मीडियाचे ; पालटले चित्र समाजाचे….!
एका स्पर्धकासाठी किमान सात मिनिटे व कमाल नऊ मिनिटे वेळ देण्यात येईल. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक पारितोषिक पाच हजार रुपये सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र कै.सौ. कांचन मधुकर मुरगुडकर यांच्या स्मरणार्थ श्री. मधुकर मुरगुडकर यांच्याकडून , द्वितीय क्रमांकासाठी पारितोषिक आहे तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र कालकथित गणपती रामा कांबळे यांच्या स्मरणार्थ श्री विजय कांबळे यांच्याकडून , तृतीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये व सन्मानचिन्ह कालकथित शालन शिर्के यांच्या स्मरणार्थ प्रा. डॉ. अनिल शिर्के यांच्याकडून तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक 1000 रुपये व प्रमाणपत्र कै. दत्तू परशुराम कार्वेकर यांच्या स्मरणार्थ प्रा. डॉ. एन. डी .कार्वेकर यांच्याकडून अशी भरघोस पारितोषिके या स्पर्धेला ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. प्रत्येक शाळेतून जास्तीत जास्त तीन स्पर्धक सहभागी होऊ शकतात.
या स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी २२ सप्टेंबर पूर्वी स्पर्धा समन्वयक प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर (9423304414) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन गोगटे– वाळके कॉलेज, बांदाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले आहे ही स्पर्धा गोगटे-वाळके कॉलेज , बांदा ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथे बुधवार दि.२५ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता सुरू होईल. तरी या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करावी असे संयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.


