Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

कराटेतून मिळते शिस्त, चपळपणा अन् शारीरिक तंदुरुस्ती बाणावते! : पीएसआय प्रमोद पाटील ; कराटे मार्शल, आर्टचे नऊ विद्यार्थी ब्लॅक बेल्टसाठी पात्र!

सावंतवाडी : आपल्या जीवनात खेळाला अत्यंत महत्त्व आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर एक तरी खेळ खेळायला पाहिजे. कराटेसारख्या खेळातून मुलांमध्ये चपळपणा, शिस्त तसेच शारीरिक तंदुरुस्ती येत असते. अलीकडच्या काळात महिलांनी स्वसंरक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षण घेतलेच पाहिजे, असे मत सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथे आयोजित कार्यक्रमात श्री. पाटील बोलत होते.

सावंतवाडी कुडाळ व ओरोस येथे सुरू असलेल्या ओकिनावा गोजूकान कराटे डो मार्शल आर्ट असोसिएशन सिंधुदुर्ग या संस्थेमार्फत दि. २० आणि २१ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या कराटे ब्लॅक बेल्टच्या परिक्षेमध्ये नऊ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन यांनी ब्लॅक बेल्ट प्राप्त केला आहे. डावीकडून १. इशांत पवार – आर पी डी ज्युनियर कॉलेज, सावंतवाडी. २. राजवर्धन ठाकूर – डॉन बॉस्को हायस्कूल, ओरोस. ३. तनमय गवस – डॉन बॉस्को ज्युनियर कॉलेज, ओरोस. ४. निलेश राऊळ – एम व्ही जे कॉलेज, सांगेली. ५. अदिती नाटलेकर – मिलाग्रीज हायस्कूल, सावंतवाडी. ६. सोहम सावंत – मिलाग्रीज हायस्कूल, सावंतवाडी. ७. सानिध्य वेल्हाळ – मिलाग्रीस ज्युनियर कॉलेज, सावंतवाडी. ८. आर्यन कदम – कुडाळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, कुडाळ. ९. शैलेश राऊळ – एस पी के कॉलेज, सावंतवाडी.
तसेच ईतर ६० विद्यार्थ्यांनी येल्लो बेल्ट, ऑरेंज बेल्ट, ग्रिन बेल्ट, ब्लू बेल्ट व ब्राऊन बेल्ट प्राप्त केले आहेत. सदर  कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील तसेच डॉ. हंसी कॅप्टन एस सी डुराई सर, 9 th डिग्री रेड बेल्ट (जापान) बेंगलोरमधून उपस्थित होते.

या सर्व विद्यार्थ्यांना दिलीप बाळकृष्ण राऊळ 3 rd डिग्री ब्लॅक बेल्ट, एनएसजी कमांडो, माजी सैनिक यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles