सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने पंचायतराज अभियान बाबत आयोजित केलेल्या ग्रामसभेला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

या आयोजित ग्रामसभेत ग्रामपंचायतकडून ग्रामपंचायत पाणी कर्मचारी सिद्धेश मुरकर, प्रतीक नाईक, श्रीकृष्ण इन्सुलकर, नंदू पालयेकर, राजू मोरुडकर, सर्पमित्र उल्हास कोरगावकर, उद्योजकअविनाश कुंभार, तालुक्यात प्रगत शेतकरी म्हणून पहिला क्रमांक मिळविलेले बाळू मुळीक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सौ मिलन पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे,ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक,अर्जुन मुळीक,स्नेहल मुळीक,कविता शेगडे,महेश शिरसाठ,मधुकर जाधव, गिरिजा मुळीक,पोलीस पाटील दिगंबर मसुरकर,पोलीस पाटील बंटी मुळीक,आदिशक्ती अभियान अध्यक्ष ज्योति शिरसाठ,तंटामुक्ती अध्यक्ष दर्शना शिरसाट, सी आर पी, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी,महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


