सिंधुदुर्ग : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्गतर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित – मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या 14 वर्षे खालील वयोगट मुली वैयक्तिक प्रकारात प्रशालेची विद्यार्थिनी कु. महिमा गवंडर हिने प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले आहे त्याचप्रमाणे 17 वर्षे खालील वयोगट मुले वैयक्तिक प्रकारात प्रशालेचा विद्यार्थी कु. आयुष कंटक याने तृतीय क्रमांक मिळवून आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवत विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान बळकट केले आहे
या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती नीलिमा अडसूळ, प्रशिक्षक श्री. सुमुख चव्हाण, मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर, क्रीडा शिक्षक भूषण परब तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
बॅडमिंटन वैयक्तिक क्रीडा प्रकारात मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल विभागस्तरावर!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


