सावंतवाडी : येथील मिलाग्रीस हायस्कूल प्रशालेतील विद्यार्थिनी कुमारी मेहविश जुबेर शेख इयत्ता आठवी हिचे आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
तिच्या या निधनाचे वृत्त समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रशालेतील एक होतकरू, हुशार विद्यार्थिनी म्हणून ती शाळेत प्रसिद्ध होती. तिच्या या अकाली निधनाने प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच पालक वर्गातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अतिशय नम्र व सालस स्वभावाच्या या विद्यार्थिनीचे अकाली जाणे हे सर्वांनाच चटका लावून गेले आहे. प्रशालेच्या वतीने मेहविश हिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.
अत्यंत वेदनादायी ! – मिलाग्रीस प्रशालेची विद्यार्थिनी मेहविश शेखचे दुःखद निधन!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


