सावंतवाडी : तालुक्यातील नेमळे कुंभारवाडी येथील मोहनदास खराडे (वय 62) हे आज सकाळी ६ वाजता आपल्या कामानिमित्त घर बंद करून बाहेर गेले असता दुपारी तीन वाजता आल्यावर पाहिले तर खिडक्याच्या काच फोडून व आतील कडी काढून कपाटातील सोन्याचे सुमारे 11 तोळ्याचे दागिने व 35 हजार रुपयाची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेले असून त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान घटनास्थळी सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर, हवालदार श्री. शिंगाडे, श्री. धोत्रे आदि टीमने भेट दिली असून श्वान पथक वगैरे तपासणी, तपास कामकाज चालू आहे.


