सावंतवाडी : आज भल्या पहाटे वाहन क्रमांक GA 03R- 7793 या महिंद्रा झायलो वाहनातून आरोपी 1) गौस मुजावर (वय 37, रा.म्हापसा गोवा) 2) रबानी भंडारी (वय 30 रा. हनगल, कर्नाटक) हे दोन गोवंश सदृश्य प्राण्याचे 290 किलो मांस विनापरवाना बेकायदेशीरपणे कर्नाटक ते गोवा अशी वाहतूक करताना नाकाबंदी वेळी माजगाव गोठणेश्वर येथे मिळून आल्याने नमूद वाहन पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम 5, 9 मोटर वाहन कायदा 192 वगैरे प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई 26 सप्टेंबर रोजी पहाटे 12 ते 4 या वेळेत करण्यात आली आहे.
विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहने चेक करण्यात येत असून पोलिसांमार्फत असे आवाहन करण्यात येते की कोणालाही अशा प्रकारची अवैध मांस किंवा प्राणी वाहतूक माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांना संपर्क करावा. पोलिसांकडून रीतसर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
बेकायदेशीरपणे गोमांस वाहतूक प्रकरणी दोन जणांवर सावंतवाडी पोलिसांची कारवाई!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


