सावंतवाडी : मंगळवार दिनांक 30 9 2025 रोजी सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले व शिरशिंगे विकास संस्था आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी संवाद मेळावा उत्साहात पार पडला हा संवाद मिळावा जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांच्या संकल्पनेतून आयोजित केला गेला.
या मेळाव्याचा मूळ उद्देश शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणे त्यांच्या समस्या जाणून घेणे तसेच बँकेच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण करणे हा होता.
यावेळी आपल्या प्रस्ताविक निवेदनात बोलताना संचालक रवींद्र मडगावकर यांनी सर्व शेतकऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सर्वतोपरी मदत केली जाणार असून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम तसेच त्यांच्या शेती मधील समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यकते उपाययोजना बँकेमार्फत केली जातील, असे उपस्थित शेतकऱ्यांना आश्वस्त केले.

यावेळी महाराष्ट्र सरकारचे आरोग्य खाते तसेच शेती खाते यांचे प्रतिनिधी उपस्थित होते यांचेमार्फत आरोग्याबाबत उद्भवणाऱ्या समस्या व त्यावर उपाययोजना तसेच आयुष्मान योजने सारख्या योजना बद्दल विस्तृत माहिती देण्यात आली तसेच शेती खात्यामार्फत उपलब्ध असलेल्या विविध सबसिडी तसेच नवनवीन येत असलेल्या योजना याबाबत शेतकऱ्यांना सजग करण्यात आले तसेच या संबंधित शेतकऱ्यांनी नमूद केलेल्या समस्यांना अधिकाऱ्यांकडून योग्य ते उपाय सूचवले गेले.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत जिल्हा बँकेकडे असलेल्या वेगवेगळ्या डिजिटल सेवा बचतीचे महत्त्व कर्ज योजनांबाबत ची माहिती देण्यात येऊन याबाबत येत असलेल्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच उपस्थित शेतकऱ्यांना सिंधुदुर्ग बँकेच्या एटीएम कार्डचे वितरण करण्यात आले.
या शेतकरी संवाद मेळाव्याचे अध्यक्षस्थान भूषवताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आपल्या जिल्ह्यातील जैव विविधता, निसर्ग तसेच या निसर्गाचा आपल्या पर्यावरणाचा वापर करून पर्यटनावर आधारित व्यवसाय करण्यासाठीचे मार्गदर्शन उपस्थित तरुण शेतकरी वर्गाला केले. यावेळी शेतकरी तरुण वर्गाने कमी पगाराच्या शहरातील नोकऱ्यांना न भुलता त्यांच्याकडे असलेले खरे सोने म्हणजे त्यांची जमीन, त्यांची शेती याचे मूल्य ओळखून शेती व शेतीपूरक व्यवसायांना अग्रक्रम द्यावा, असे आवाहन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याला सध्या दोन लाख लिटर दुधाची आवश्यकता असून सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये एक लाख लिटर दुधाची निर्मिती होत असल्याबाबत नमूद करताना तरुण शेतकरी वर्गाने दुग्ध व्यवसायासाठी आपले पाऊल उचलावे व या सर्वांसाठी लागणारे आर्थिक पाठबळ बँकेमार्फत कर्ज स्वरूपात उपलब्ध केले जाईल, एवढेच नव्हे तर यासाठी लागणारे प्रशिक्षण देखील कसे उपलब्ध करून देता येईल याचाही उल्लेख त्यांनी आवर्जून केला
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सर्वात शेवटच्या व्यक्तीपर्यंत चांगल्या प्रतीचे बँकिंग पोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून यासाठी आपण कटिबद्ध असल्याबाबत सांगितले.
शेवटी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आजची घोडदौड म्हणजे 6000 कोटींचा व्यवसायाचा टप्पा गाठणे तसेच वेगवेगळ्या पातळींवर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अव्वल स्थान प्राप्त करून देणे यासाठी चे सर्व श्रेय हे आपणा सर्व जिल्ह्यातील बँकेच्या मायबाप ग्राहकांना जाते हे आवर्जून नमूद केले. आपला विश्वास आपली साथ अशीच जिल्हा बँकेबरोबर कायम राहील आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँक आपणा सर्वांना वेगवेगळ्या माध्यमातून नवनवीन योजनांमधून आपल्यासमोर येत राहील अशी आशा व्यक्त केली
आजच्या वेरले येथील शेतकरी मेळाव्यामध्ये सैनिक बँकेचे चेअरमन सन्माननीय बाबुराव कविटकर सैनिक बँकेचे सीईओ सन्माननीय सुनील राऊळ वेरले विकास सोसायटीचे चेअरमन श्रीयुत विजय राऊळ गावचे सरपंच सौ रुचिता राऊळ गावचे उपसरपंच मोहन राऊळ, सोसायटीचे संचालक आणि ग्रामपंचायत सदस्य दिलीप राऊळ, विलास राऊळ आणि ज्येष्ठ गावकरी शिवा राऊळ लाडजी राऊळ, बाबा राऊळ, भगवान राणे, पुंडलिक कदम, आदी संचालक तसेच प्रसाद गावडे,राजन राणे,सुभाष राऊळ,आणि शेतकरी वर्ग मोठ्याप्रमाणात उपस्थित प्रमाणावर उपस्थित होते.सूत्र संचालन श्री शंकर पावसकर,आभारप्रदर्शन श्री .भगवान राणे यांनी केले.
शिरशिंगे येथील मेळाव्यात गावचे सरपंच श्री दीपक राऊळ सोसायटीचे चेअरमन श्री दिलीप राणे व्हाईस चेअरमन रघुनाथ परब माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय नारायण राऊळ, सुरेश शिर्के, पांडुरंग राऊळ, गणपत राणे,प्रशांत देसाई सोसायटीचे सर्व संचालक आणि शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


