Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

पाकिस्तानचा ‘या’ देशाच्या सैनिकांवर हल्ला! ; अनेकजण जखमी, युद्धाला सुरुवात?

इस्लामाबाद : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरून मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानी सैन्याने कुनार सीमेवर तालिबानचे नियंत्रण असलेल्या सैन्यावर गोळीबार केला आहे. या गोळीबारात बरेच तालिबानी सैनिक जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या या गोळीबाराला तालिबानी सैन्याने प्रत्युत्तर देत गोळीबार केला, त्यामुळे सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. या दोन्ही देशांमध्ये गोळीबार होण्याची पहिलीच वेळ आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कुनार प्रांतातील डोकलाम सीमेवर पाकिस्तानी आणि तालिबानी सैन्यात चकमक झाली आहे. यावेळी दोन्ही बाजूंनी अनेक गोळीबार झाला. त्यामुळे सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी काळात गोळीबार आणखी वाढणार की प्रकरण शांत होणार याबाबत माहिती समोर आलेली नाही. कारण तालिबानने याबाबत अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

गोळीबार का झाला?

पाकिस्तानी सैन्य डोकलाममध्ये प्रवेश करून दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याच्या तयारीत होते. या भागात तेहरिक-ए-तालिबान संघटनेटचे दहशतवादी लपल्याचा संशय पाकिस्तानी सैन्याला होता. मात्र या कारवाईला तालिबानने विरोध केला. या कारणामुळे पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. पाकिस्तानच्या गोळीबाराला तालिबानकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. त्यामुळे सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानी सैन्याते म्हणणे आहे की, सुमारे 6000 तेहरिक-ए-तालिबानी दहशतवादी अफगाणिस्तानात लपले आहेत. या सर्वांचा खात्मा पाकिस्तान एक ऑपरेशन करत आहे. यात हवाई आणि भूदलाचाही समावेश आहे.

दोन्ही देशांमध्ये युद्ध पेटणार?

गेल्या काही काळापासून पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. पाकिस्तानने जवळपास 3 लाख अफगाणी लोकांना त्यांच्या देशात पाठवले आहे. बग्राम एअरबेच्या मुद्द्यावरूनही दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. अमेरिकेने बग्राम एअरबेस ताब्यात घेण्याची भाषा केली होती, त्याच काळात पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पंतप्रधान शरीफ यांनी अमेरिकेला भेट दिली होती.

त्याचबरोबर पाकिस्तान दहशतवादासाठी अफगाणिस्तानवर ठपका ठेवत आहे. या मुद्द्यावरून अमेरिका अफगाणिस्तानमध्ये घुसण्याचा प्रयत्न करु शकतो. कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की “आम्ही बग्राम एअरबेस ताब्यात घेऊ.” याला विरोध करताना तालिबानने आम्ही एक इंचही जमीन देणार नाही”, असं विधान केलं होतं.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles