सावंतवाडी : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, तसेच माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आ. दीपक केसरकर यांच्या सुचनेने शिवसेना जिल्हाप्रमुख पक्षाच्या संजू परब यांच्याहस्ते सिंधुदुर्ग जिल्हा ‘सचिवपदी’ सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते परीक्षित नारायण मांजरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
आज जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या हस्ते परीक्षेत मांजरेकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद ढेरे, युवा सेना विधानसभा प्रमुख अर्चित पोकळे, युवा सेना सचिव उमेश आरोलकर, प्रथमेश सावंत, सत्यवान बांदेकर, विनोद सावंत, प्रशांत साटेलकर, सुमित कोरगावकर, आबा केसरकर यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


