Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

JOBS – कोट्यावधी युवकांना बँकेत मिळणार नोकरी ; पगार किती? कसा कराल अर्ज?, सविस्तर माहिती एका क्लिकवर.

मुंबई : देशातील करोडो पदवीधरांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील बँका पदवीधरांना नोकऱ्या देणार आहेत. येत्या महिनाभरात याची प्रक्रिया सुरु होणार आहे. दरम्यान, पदवीधरांना किती दिवस नोकऱ्या मिळणार हे अद्याप समोर आलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, बँक एका महिन्यात 25 वर्षांखालील पदवीधरांना नोकऱ्या देणार आहे.

देशातील कोट्यवधी पदवीधरांच्या नोकरीचा प्रश्न सुटणार –

बँक एका महिन्यात 25 वर्षांखालील पदवीधरांना नोकर्‍या देणार आहे. यामुळं देशातील कोट्यवधी पदवीधरांच्या नोकरीचा प्रश्न सुटणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही नोकरी अप्रेंटिसच्या स्वरुपात असणार आहे. विशिष्ट कौशल्यांचे प्रशिक्षण घेतलेल्या अशा इंटर्न्सना बँका दरमहा 5000 रुपये मानधन मिळण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय घोषणेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. ज्या अंतर्गत पुढील पाच वर्षांत एक कोटी तरुणांना शीर्ष 500 कंपन्यांमध्ये प्रशिक्षण (इंटर्नशिप) देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

काय आहे पात्रता?

अनेक क्षेत्रे आहेत जिथे आपल्याला कुशल मनुष्यबळाची गरज आहे. उदाहरणार्थ मार्केटिंग, रिकव्हरी, आपण त्यांना त्या क्षेत्रात प्रशिक्षण देऊ शकतो आणि ते स्वतःसाठी रोजगार निर्माण करू शकतात. ॲप्रेंटिसशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21-25 वर्षांच्या दरम्यान असावे आणि तो पदवीधर असावा. करदाता नसावा आणि IIT किंवा IIM सारख्या सर्वोच्च संस्थांमधून पदवी नसावी.

नोकरीचा कालावधी किती?

मिळालेल्या माहितीनुसार पदवीधर असलेल्या तरुणांना किमान 12 महिन्यांपर्यंत कामावर ठेवता येईल. त्यांना लास्ट माईल बँकिंग सेवा घेण्यासाठी व्यवसाय प्रतिनिधींसारख्या इतर क्षेत्रात देखील नियुक्त केले जाईल. दरम्यान, त्यापैकी काही जणांना कर्मचारी म्हणून सामावून घेतले जाण्याचीही शक्यता आहे.

महिनाभरात भरतीची प्रक्रिया होणार सुरु –

महिनाभरात बँकेत नोकरभरती करण्याची अंमलबजावणी होऊ शकते. बँका किती शिकाऊ उमेदवारांना नोकरी देतील हे त्यांनी स्पष्ट केले नसले तरी या उपक्रमात सर्व बँका सहभागी होणार आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाचेही सहकार्य मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळं ज्या युवकांनी पदवी घेतली आहे, त्यांनी सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत. बँक पुढच्या एका महिन्यात ही प्रक्रिया सुरु करणार आहे. 25 वर्षांखालील पदवीधरांना या नोकऱ्या दिल्या जाणार आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles