अहमदाबाद : अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा युवा फलंदाज ध्रुव जुरेल चमकला. पाचव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या जुरेलने वेस्ट इंडिजविरुद्ध आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. शतकानंतर त्याचा सेलिब्रेशन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. जुरेलने आपली बॅट रायफलसारखी खांद्यावर धरली आणि आर्मी कडक सॅल्यूट दिला. त्याचे वडील कारगिल युद्धातील शूरवीर सैनिक असल्यामुळे त्याचा कल लहानपणापासूनच सेनेकडे आहे. त्यामुळे त्याचा हा अंदाज चाहत्यांच्या मनाला भावला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ध्रुव जुरेलचं पहिलं शतक –
जुरेलने 210 चेंडूंमध्ये 125 धावांची खेळी खेळली. त्याच्या या डावात 15 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. सुरुवातीला संयमाने खेळ करणारा जुरेल नंतर विंडीज गोलंदाजांच्या खराब चेंडूंवर जोरदार फटकेबाजी करताना दिसला. अखेरीस तो होपच्या हाती झेलबाद झाला. याआधी के. एल. राहुलनेही शतक झळकावले होते. तो 100 धावांवर बाद झाला.


